तुमच्या आवडत्या व्यक्तीवर निबंध लिहा.
Spams and copied answer will be reported
Answers
Answer:
मला आठवते मी सातव्या वर्गात असताना !!मी एक खुपच लोफर व ढ असा मुलगा होतो ..शाळेला सुट्टी मारुन नदीवर पोहा़यला जाणे, गोट्या खेळणे व इतर प्रकारचे जुगार खेळणे हे माझे रोजचे दिनकार्य असत !! मला शाळेत जाणे मुळीच आवडत नसे,वडिल मला सकाळी शाळेत सोडुन येत होते पण मी दुपारी शाळेतुन पळुन नदीवर जात होतो वडिल कामात व्यस्त असल्यामुळे त्यांचे माझ्यावर जास्त लक्ष नव्हते याचा मी पुरेपुर फायदा घेत होतो..असेच माझ्या आयुष्याचे दिवस जात होते असे चालत असतानाच- एक दिवस असा आला की त्या दिवसा पासुन माझे आयुष्यच बदलले !!
झाले असे की :- त्या दिवसी मी टीव्ही पाहत होतो ..टीव्ही पाहत असतानाच दुरदर्शन चँनेल वर जब्बार पटेल सर निर्देशित
"#डॉ_बाबासाहेब_आंबेडकर"हा सिनेमा चालु होता.. मी तो सिनेमा पाहत बसलो पाहता पाहता मी त्या सिनेमात एकदम हरवुन गेलो ..बाबासाहेंबाचे शिक्षणावर प्रेम पाहुन, त्यांचे संघर्ष पाहुन मी एकदम अचंबित झालो व तेव्हा पासुनच मी #बाबासाहेबांना माझे आयुष्याचे आदर्श मानले !!त्यादिवसा पासुनच मला बाबासाहेबांबद्दल जाणुन घेण्याचे वेड लागले त्यासाठी मी अनेक ग्रंथालयात जावुन बाबासाहेंबा बद्दल लिहलेली अनेक पुस्तके वाचुन काढली व वाचुन प्रेरणेने पेटुन गेलो!! व एक महत्त्वाचा निर्णय घेतला की मी आता कधीहि कोणत्याही प्रकारचा जुगार खेळणार नाही व आता दररोज शाळेत जाऊन चांगले शिक्षण घेऊन बाबासाहेबांसारखे समाजासाठी काही तरी करायचे आहे या आशेने अभ्यास सुरु केला व सध्या ही तो सुरुच आहे !!
सातवीत माझ्या पास होण्याची ही खात्री नव्हती पण मी एकदम चांगल्या मार्काने पास झालो व 8 वीत चक्क वर्गाचा मॉनिटर झालो व सातवी पेक्षाही चांगल्या गुणांनी पास झालो !!
असे करत करत मी १२वी सुद्धा एकदम चांगल्या गुणांनी पास झालो व आता मी बी. ए मध्ये प्रवेश घेऊन यु.पी.एस.सी ची तयारी करत आहे !!
आणि लवकरच एक क्लास १ अधिकारी होईन याचा मला पुर्ण आत्मविश्वास आहे,आणि हे फक्त आणि फक्त डॉ.बाबासाहेबांमुळेच!!
भारतात अनेक वर्षांपासून क्रिकेटचा खेळ खेळला जात आहे, तो एक अतिशय प्रसिद्ध आणि रोमांचक खेळ आहे. हा खेळ मुलांना खूप आवडतो, साधारणपणे त्यांना लहान मैदान, रस्ते इत्यादी कोणत्याही छोट्या मोकळ्या ठिकाणी क्रिकेट खेळण्याची सवय असते. मुलांना क्रिकेट आणि त्याचे नियम आणि नियमांची माहिती घेऊन प्रामाणिकपणे खेळायला आवडते. भारतातील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळल्या जाणाऱ्या खेळांमध्ये क्रिकेट सर्वात प्रसिद्ध आहे. लोकांमध्ये क्रिकेटची लोकप्रियता इतकी जास्त आहे की हा खेळ पाहण्यासाठी स्टेडियममध्ये जाणाऱ्या प्रेक्षकांची गर्दी इतर कोणत्याही खेळाकडे क्वचितच जाते.