Physics, asked by kalpanawaghmare57, 1 month ago

तुमच्या घरात असलेल्या विद्युत घटांची नावे सांगा​

Answers

Answered by lohitjinaga
12

Answer:

घरातल्या विद्युत रचनेची,उपकरणांची दुरुस्तीची माहिती पुस्तकांत, इतर ठिकाणी मिळाली तरी कोणी स्वत: करायला जात नाही कारण शॅाक लागायची भिती असते .परंतू बाहेरचे इलेक्ट्रीशनस उगाचच वायरिंग बदलायला सांगतात. "पाचसात वर्षे झाली ना? करा बदली. वीज बिल जास्ती येतंय? करा बदली. बटणस बरोबर नाही लागत? करा बोर्ड बदली. दहाबारा हजारला फोडणी.

पण तसं नसतं. कित्येकदा कॅान्टॅक्टस जुने होतात. सामान्य लोक ते करू शकत नाहीत आणि वायरमन लोकांना जुनी कामं करायची नसतात. नवीन कामात पैसे लगेच मिळतात. थोडीफार माहिती घेतल्यास फायदा होतो. केवळ पंचवीस वर्षे झाली म्हणून कॅापर वायर काढून अॅल्युमिनिअम वायरिंग गळ्यात मारतात. ते टाळता येते. कमीतकमी उपकरणे आणि त्यांची माहिती असायला काहीच हरकत नाही.

इथेच आपण प्रश्न विचारू आणि माहितीची देवाणघेवाण करूया.

विषय सूचीकडे परत जा

सिलींग फॅन

सामान्य प्रश्न - १

विजेचे बटण / बोर्डावरचा पंखा ,ट्युबलाइट इत्यादीसाठीचा असणारा ऑनऑफ स्विच गरम होतो.अथवा ऑन केल्यावर लागत नाही .

-

वर दिसणाय्रा प्लास्टिकच्या बटणाखाली आतमध्ये मेन सप्लाइ ( फेज म्हणतात) आणि दिवा/पंखा इकडे जाणाय्रा वायरची टोके स्क्रू वापरून बाजुबाजुला आणलेली असतात. बटण दाबल्यावर त्या दोन टोकांत संपर्क केला जातो आणि सप्लाइचा विद्युत प्रवाह दिव्याच्या वायरीला जोडला जातो ,दिवा लागतो. मग आपल्याला वरून शॅाक का लागत नाही? तर त्या प्लास्टिकमधून वीज वाहात नाही म्हणून. घराच्या वायरिंगमधले स्विचेस हे कच्चे दुवे आहेत कारण इथे यांत्रिक हालचाल होते व सतत चालूबंद करण्यामुळे तांब्याचे कॅान्टॅक्टसवर काळा थर चढतो. त्यातून प्रवाह वाहू शकत नाही. स्विच गरम होऊ लागतो. चालूबंद करताना बटणामागे ठिंणग्या दिसतात. शिवाय दाबून धरणारी स्प्रिंग गंजून तुटते,सैल होते. अशावेळी तो स्विच बदलणे हा उपाय आहे. फक्त स्क्रू पिळून, कॅान्टॅक्टस साफ करूनही जागच्याजागी दुरुस्ती होऊ शकते. वायरिंग बदलण्याची गरज नाही. परंतू हे काम सर्वांनाच जमण्यासारखे नाही.

Answered by soniatiwari214
0

उत्तर:

आमच्या घरातील काही इलेक्ट्रॉनिक घटक: फ्यूज, मेन स्विच (MCCB), ट्रिप स्विच (RCCB), वॉल स्विचेस, प्लग सॉकेट्स, इंडक्टर्स, डिस्ट्रिब्युशन बॉक्स, रेझिस्टर, कॅपेसिटर, लाइट एमिटिंग डायोड (LED), ट्रान्झिस्टर आणि इलेक्ट्रिक मीटर.

स्पष्टीकरण:

कोणताही इलेक्ट्रॉनिक घटक म्हणजे इलेक्ट्रॉन किंवा त्यांच्याशी संबंधित फील्डवर परिणाम करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या इलेक्ट्रॉनिक प्रणालीमधील कोणतेही मूलभूत स्वतंत्र उपकरण. ते सर्किटचे घटक आहेत जे त्याच्या चांगल्या कार्यात मदत करतात. त्यांच्याकडे अनेक विद्युत टर्मिनल आहेत. हे दैनंदिन जीवनात खूप उपयुक्त आहेत.

म्हणून, फ्यूज, मेन स्विच (MCCB), ट्रिप स्विच (RCCB), वॉल स्विचेस, प्लग सॉकेट्स, इंडक्टर्स, डिस्ट्रिब्युशन बॉक्स, इलेक्ट्रिक मीटर, रेझिस्टर्स, कॅपेसिटर, लाइट एमिटिंग डायोड (LED), ट्रान्झिस्टर इत्यादी काही इलेक्ट्रॉनिक घटक आहेत.

#SPJ3

Similar questions