तुमच्या लहान भावाचा किंवा बहिणीचा धावण्याच्या शर्यतीत प्रथम क्रमांक आल्याबद्दल अभिनंदन पत्र लिहा.
Answers
Answer:
प्रिय भावा,
अभिनंदन.. मी ऐकलं आहे की तू धावण्याच्या शर्यतत प्रथम क्रमांक मिळवला आहे. खूप छान. आसीच प्रगती कर. तुला बक्षीस म्हणून काय मिळाले ते मला सांग हा. आशीच प्रगती करत रहा आणि घरच्याचे नाव उज्वल कर हाच आशीर्वाद.
तुझी बहिण
Answer:
दिनांक: ५ जानेवारी, २०२१
प्रिय आकाश,
मला तू प्रथम आल्याची बातमी कळाल्यानंतर खूप आनंद झाला. तुझे मनापासून अभिनंदन.मी लहानपणापासून तुला पाहत आहे तू नेहमी धावण्याच्या शर्यतीत भाग घेण्यासाठी उत्सुक असतो. तुझा सततचा सराव आणि मेहनत घेण्याची तयारी यामुळेच तुला धावण्याच्या शर्यतीत प्रथम क्रमांक मिळाला आहे.
आपण जे काही करतो त्याचा आनंद मिळत असेल तर आपल्याला यश निश्चित मिळते ते तू नेहमी सांगतो आणि ते आज करून दाखवले. तू असाच मेहनत करत राहा तुला यश नक्कीच मिळत राहील.
माझ्या शुभेच्छा नेहमी तुझ्या सोबत असतील. मी लवकरच गावाला येणार आहे. मग आपण दोघे मिळून खूप मज्जा करूया.
तुला खूप सारे आशीर्वाद व आई बाबांना नमस्कार.
तुझा दादा,
अविनाश