-- तुमच्या मित्राच्या मैत्रिणीच्या चतुरपणाचे कौतुक झाल्याचा प्रसंग घरी व वर्गात सांगा.
Answers
Answer:
मीनाची चतुराई
माझी वर्गमैत्रीण मीनाला फार हुशार मुलगी म्हणून सगळे ओळखतात. एकदा तिचे आईवडील नातेवाईकांकडे गेले होते, तेव्हा ती घरी एकटीच होती. सायंकाळी झाली तेव्हा कोणीतरी दार ठोठावले. दिशाने दार उघडताच दोन भुरटे चोर घरात घुसले. त्यांनी दिशाला चाकू दाखवून दागिने कुठे ठेवले आहेत ते विचारले. दिशाने त्यांना कपाटाच्या खोलीत नेले. चोरांनी कपाटात दागिने शोधायला सुरुवात करताच दिशाने धावत बाहेर येऊन त्या खोलीचा दरवाजा लावून घेतला. शेजारच्या काका-काकूंना पटकन सत्य परिस्थिती सांगितली. त्यांनी लगेच पोलिसांना फोन लावला. त्यांना वाटले, की चोरांनी एव्हाना दागिने चोरले असतील; पण दिशाने त्यांना मुद्दाम चुकीच्या खोलीत नेले होते. त्या कपाटात दागिनेच नव्हते. त्यामुळे, चोर खूप वेळ दागिने शोधण्यात गुंग झाले. तोवर आजूबाजूचे इतर लोक तेथे जमले होते. चोरांनी तिथून पळून जाण्याचाही खूप प्रयत्न केला. परंतु, दरवाजा बाहेरून बंद असल्याने त्यांना ते शक्य झाले नाही. थोड्याच वेळात पोलीसही तेथे हजर झाले व त्यांनी चोरांना ताब्यात घेतले. या प्रसंगावधानीपणामुळे पोलिसांनी, शेजारच्यांनी, आईवडिलांनी दिशाच्या चतुराईचे खूप कौतुक केले.
Answer:
thanks
Explanation:
can i get one more answer in short please