Hindi, asked by vilasrathodm157, 3 months ago

तुमच्या परिसरात भूकंप आल्यास तुम्ही काय कराल मराठीत वर्णन करा

Answers

Answered by borhaderamchandra
2

Answer:

भूकंप येत असताना जर तुम्ही घरात असाल तर ...

जमिनीवर बसून जायला पाहिजे ...

वजनदार टेबल किंवा एखाद्या फर्निचरच्या खाली आश्रय घ्या ...

टेबल न असल्यास हाताने चेहरा आणि डोक्याला झाकणे ...

घरातील एखाद्या कोपर्‍यावर जाऊन बसणे ...

काच, खिडक्या, दार आणि भिंतींपासून दूर राहा ...

जर गादीवर झोपले असाल तर तसेच पडून राहा आणि उशीने आपले डोके झाकून घ्या ...

जवळ पास वजनदार फर्निचर असतील तर त्यापासून दूर राहा ...

लिफ्टचा प्रयोग करणे टाळा ...

लिफ्ट पेंडुलमप्रमाणे हालून भिंतीला टक्कर मारू शकते ...

वीज गेल्यामुळे देखील लिफ्ट थांबू शकते

धक्के येईपर्यंत घरातच राहा ....

धक्के थांबल्यानंतरच घराबाहेर पडा ...

भूकंप येता जर घराबाहेर असाल तर ...

उंच भवन, विजेचे खांब इत्यादी पासून दूर राहा ...

जोपर्यंत धक्के संपत नाही तोपर्यंत बाहेरच राहा ...

चालत्या गाडीत असाल तर लवकरच गाडी थांबवून द्या ...

गाडीत बसून राहा ...

पूल किंवा रस्त्यावर जाण्यापासून स्वत:चा बचाव करा, ज्यांना भूकंपामुळे नुकसान झाले असतील....

जर तुम्ही भूकंपादरम्यान मातीच्या ढिगार्‍यात दबला असाल तर ...

चुकूनही आगपेटीचा वापर करू नका ...

हालू नका आणि धूळ ही उडवू नका ...

एखाद्या रुमाल किंवा कपड्याने चेहरा झाकून घ्या ...

एखाद्या पाइप किंवा भिंतीला ठकठकावात राहा, ज्याने बचाव दलाचे लक्ष तुमच्याकडे जाईल ...

जर शिटी उपलब्ध असेल तर ती वाजवत राहा ...

जर काही माध्यम नसेल तर ओरडत राहा, हो ओरडल्याने तोंडात धूळ जाण्याचा धोका असतो म्हणून सावध राहा....

Similar questions