तुमच्या शाळेच्या मुख्याध्यापकांना विज्ञान प्रदर्शनात भाग घेण्याच्या इच्छा बद्दल पत्र लिहा
Answers
प्रति,
मा. मुख्याध्यापक
सत्यजीत इंग्लिश स्कूल,
नागपूर
विषय : विज्ञान प्रदर्शनात भाग घेण्या बाबत.
आदरणीय सर,
माझं नाव अनिकेत चव्हाण असून मी वर्ग १०वी चा विद्यार्थी आहे. मला आपल्या शाळेच्या विज्ञान प्रदर्शनात भाग घेण्याची इच्छा आहे. तरी आम्ही चार विद्यार्थी आहोत.
सर आपणास विनंती आहे की वरील विषयी मला माहिती द्यावी आणि प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी लागणारे कागद पत्र सांगावे. यासाठी मी आपला आभारी आहे.
धन्यवाद.
आपला विद्यार्थी
अनिकेत चव्हाण.
निखील मोरे ,
इयत्ता - सातवी ,
शिवाजी हायस्कूल ,
करमाळा .
दि. २५ ऑगस्ट २०२२
प्रति,
मा. मुख्याध्यापक
शिवाजी हायस्कूल ,
करमाळा .
विषय : विज्ञान प्रदर्शनात भाग घेण्याबाबत.
महोदय,
मी निखील मोरे. आपल्या शाळेतील एक विद्यार्थी आहे . मी इयत्ता सातवी मध्ये शिकत आहे. आपल्या शाळेतील विज्ञान प्रदर्शन हे येत्या ५ सप्टेंबर रोजी होणार आहे. या प्रदर्शनात सहभाग घेण्याची माझी इच्छा आहे.
मी माझ्या वैज्ञानिक प्रकल्पाची तयारी हि गेले ३ महिने करत आहे. सर्व माहिती संकलित करून प्रकल्प माहितीपूर्ण बनवला आहे . तुम्ही मला संधी दिलीत तर माझा अभ्यासपूर्ण प्रकल्प मला सर्वांसमोर मांडता येईल.
आम्ही आपणास विनंती करतो कि, की वरील प्रदर्शनाविषयी मला अधिक माहिती द्यावी आणि प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी लागणारे निकष कळवावेत. तुम्ही या विषयात लक्ष देऊन आम्हाला तुमचा निर्णय कळवावा हि विनंती.
आपला विद्यार्थी,
निखील मोरे.
#SPJ2