India Languages, asked by priyashamistry230920, 4 months ago

तुमच्या शाळेसमोरील कचरा पेटीच्या दुर्दशेबाबत तक्रार करणारे पत्र महानगरपालिका अधिकारी याना लिहा.

Answers

Answered by steffiaspinno
12

आमच्या भागातील अस्वच्छ कचऱ्याच्या ढीगांची समस्या तुमच्या लक्षात आणून देण्यासाठी मी हे पत्र लिहित आहे. महापालिकेने अनेक ठिकाणी कचराकुंड्या बसवल्या असल्या तरी हे डबे काठोकाठ गुदमरूनच राहतात! कचरावेचक त्यांची नियमित साफसफाई करत नाही.

  • परिणामी ते दिवसभर तुंबलेले आणि दुर्गंधीयुक्त राहतात.

स्पष्टीकरण:

स्वरूप असेल -

  • महापालिकेकडे

(जेथे कार्यालय आहे ते ठिकाण)

तारीख

विषय- (कचऱ्याबाबत)

आदरणीय सर/मॅडम

.

(शरीर जिथे समस्येचा उल्लेख आहे)

(तात्पर्य)

तुमचे मनापासून

(तुमचे नाव)

(परिसर)

Answered by rajraaz85
51

Answer:

दिनांक:२ फेब्रुवारी, २०२२

प्रति,

मा. स्वच्छता निरीक्षक,

सांगली महानगरपालिका,

सांगली-६५४३२१

विषय -शाळेसमोरील कचरा पेटीच्या दुर्दशेबाबत.

माननीय महोदय,

मी आदर्श विद्यालय सांगली या शाळेचा विद्यार्थी असून आपल्या लक्षात आणून देतो की आमच्या शाळेसमोर एक मोठी कचरापेटी महानगरपालिकेच्या माध्यमातून ठेवण्यात आली आहे. कचरापेटी ही स्वच्छता निर्माण करण्यासाठी ठेवलेली असते परंतु आमच्या शाळेसमोरील कचरा पेटीची अवस्था फारच वाईट आहे. कचरापेटीत असणार्‍या कचऱ्यामुळे संपूर्ण शाळेच्या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. मी आपणास विनंती करतो की शाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्य लक्षात घेता त्या कचराकुंडीतील कचरा दररोज साफ करण्यात यावा. तसेच कचरा कुंडीची जी दुरावस्था झालेली आहे ती व्यवस्थित करावी किंवा नवीन कचराकुंडी आणून ठेवावी.

मला माहित आहे की विद्यार्थ्यांच्या आरोग्य ही नेहमीच तुमच्यासाठी पहिली पसंती असणार. कचराकुंडी मुळे शाळेच्या संपूर्ण परिसरावर त्याचा नकारात्मक परिणाम होतो.

मी तुम्हाला विनंती करतो की लवकरात लवकर आमच्या शाळेतील कचराकुंडी च्या प्रकरणात लक्ष घालावे व परिसर स्वच्छ ठेवण्यास मदत करावी.

आपला विश्वासू

सुधीर पाटील

आदर्श विद्यालय

Similar questions