Hindi, asked by rashigpt12, 5 months ago

तुमच्या शाळेत आयोजित करण्यात आलेल्या मराठी भाषा दिनाची बातमी तयार करा.​

Answers

Answered by subhashmhatre032
24

Answer:

मराठी भाषा दिनाचे औचित्य साधत मंगळवारी शहर परिसरात दिंडी, काव्यमैफल, सामूहिक वाचन यांसह इतर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. शैक्षणिक विश्वात तर चिमुकल्यांनी संत, साहित्यिक यांच्यासह पारंपरिक वेशभूषा परिधान करत मराठीचा टिळा कपाळी लावला. राजकीय पक्ष कार्यालयातही मराठी दिन उत्साहात साजरा झाला.

येथील कुसुमाग्रज स्मारक परिसरात कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सकाळी कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन करत अभिवादन करण्यात आले. यानंतर महापौर रंजना भानसी, महापालिकेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत कुसुमाग्रजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. मंगळवारी सायंकाळी प्रतिष्ठानच्या वतीने कुसुमाग्रज स्मरण यात्रेत पहिले पुष्प किशोर पाठक यांच्या संकल्पनेवर कविश्रेष्ठ ‘कुसुमाग्रजांच्या कवितांचा आविष्कार-सुवर्ण किरणावली’ ने गुंफले गेले. कुसुमाग्रजांच्या निवडक कवितांना छंदबध्द करत मकरंद हिंगणे यांनी संगीत दिले. कुसुमाग्रजांच्या कवितांचे यावेळी वाचन तसेच गायन झाले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राजगड कार्यालय येथे कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी प्रदेश सरचिटणीस माजी महापौर अशोक मुर्तडक, मनसे प्रदेश उपाध्यक्ष अ‍ॅड. राहुल ढिकले यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Similar questions