India Languages, asked by vaishnavihekde, 6 months ago

तुमच्या शाळेत साजरा करण्यातआलेल्या क्रीडा दिनाची बातमी तयार करा.​

Answers

Answered by kalpeshvyas
24

Answer:

औरंगाबाद : दी न्यू पॉस्टॉलिक इंग्लिश हायस्कूलचा वार्षिक क्रीडा दिन व बक्षीस वितरण समारंभ शुक्रवारी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या प्रांगणावर पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महापौर नंदकुमार घोडेले यांची उपस्थिती होती.

याप्रसंगी इंग्रजी शाळांमध्ये जन्मदात्यांसोबत आजी-आजोबांना क्रीडा दिनाच्या कार्यक्रमात सहभागी करून घेण्याचा उपक्रम स्तुत्य आहे. एकत्र कुटुंब पद्धतीवर सर्वच स्तरांतून असे धडे दिल्यास येणारी पिढी ज्येष्ठ नागरिकांचा एकाकीपणाचा मोठा सामाजिक प्रश्न सोडवू शकेल, अशी आशा महापौर नंदकुमार घोडेले यांनी व्यक्त केली.

याप्रसंगी उमेश दाशरथी, शाळेचे संस्थापक शरद बावर, अध्यक्ष सुहाश दाशरथे, प्राचार्या नम्रता दाशरथे आदींची उपस्थिती होती. वार्षिक क्रीडा दिनानिमित्त मुलांची परेड, लहान मुलांचे खेळ व कवायती, आई, वडील तसेच आजी-आजोबांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्याचप्रमाणे राज्य व राष्ट्रीय पातळीवर चमक दाखवणारे विविध खेळांतील रोहन टाक, रौनक चावरिया यांच्यासह राज्यस्तरीय अबॅकसमध्ये विशेष प्रावीण्य मिळाल्याबद्दल हिमेश शिंदे यांना गौरविण्यात आले. नौशीन शेख यांना उत्कृष्ट शिक्षिका म्हणून सन्मानित करण्यात आले. सूत्रसंचालन विशाखा श्रीकांत, शेख तस्कीन व रशिदा कनोरीवाला यांनी केले.

Similar questions