तुमच्या शब्दात लिहा - आग्य्राहून सुटका
Answers
पहिल्या भेटीत उडालेल्या खटक्यामुळे मुघल सम्राट प्रचंड संतापला होता. आपला हा संताप त्याने, ‘इथून इस्तंबूलपर्यंत सात समुंदरपार सर्व आमच्यासमोर नजर झुकवून उभे राहतात. आमची नजर जाताच प्रत्येकाची पळता भुई थोडी होते. तो काफर आम्हाला नजर भिडवतो. आमच्याच दरबारात आम्हालाच नजर देण्याची हिम्मत दाखवतो. मुघली रितीरिवाजांचा अवमान करून या सुलतनतीचा मानभंग केलास. सिवा, तू आलास तुझ्या मर्जीने पण आमची मर्जी असेपर्यंत तू जिंदा राहणार आहे,’ अशा शब्दांत व्यक्त केला आहे. त्याच्या मनातील यासारख्या शिवाजीबाबतच्या अनेक भावना ‘औरंगजेब’ या दुस-या प्रकरणात वाचायला मिळतात. पहिल्या तीन प्रकरणांतूनच या दोघांमध्ये एकमेकांविषयी किती खदखद होती, याची माहिती वाचायला मिळते.
औरंगजेबाच्या भाषेत ‘दख्खनचा चुव्वा’ म्हणजेच शिवाजी आग्य्रात आल्याने त्याच्या हाती अलगद सापडला होता. त्याने महाराजांना तातडीने नजरकैदेत ठेवले. मराठी पातशाहीचा राजा तुरुंगात अडकल्याने संपूर्ण मराठी मुलुख काळजीत पडला. पाताळयंत्री, कपटी औरंगजेबाला महाराज पुरेपूर ओळखत होते. त्यामुळेच त्यांनी आपली हेरयंत्रणा कामाला लावून आणि अत्यंत धाडसाने औरंगजेबाला धडा शिकवण्याचं ठरवलं.
विश्वासू सहका-यांच्या साहाय्याने सलग अडीच महिन्यांच्या कालावधीनंतर त्यांनी आग्य्राहून स्वत:ची यशस्वी सुटका केली. या काळात औरंगजेबाकडून कधीही दगाफटका होण्याची शक्यता होती. त्यामुळे त्यांनी अखंड सावधगिरी बाळगून आणि नेतृत्वगुणांचा परिचय देत आपली सुटका करून घेतली. ही घटना भारतीय इतिहासातली एक अत्यंत महत्त्वाची घटना आहे.
या पुस्तकातील ‘नजरभेट’, ‘शिवराय’, ‘औरंगजेब’, ‘रामसिंग’, ‘शंभुराजे’, ‘मिर्झाराजे’, ‘जिजाऊ आईसाहेब’, ‘अली आदिलशहा’ ‘नेताजी पालकर’ या प्रकरणांतून या व्यक्तींच्या मनात शिवाजी महाराजांविषयी काय भावना होत्या, ते वाचायला मिळतं.
नजरकैदेच्या अडीच महिन्यांच्या काळात शिवाजी महाराजांची मन:स्थिती कशी होती, याचा वेध घेण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे. हे पुस्तक स्वगतपर लिहिल्याने वाचताना वाचकांचा गोंधळ उडण्याची शक्यता आहे. तसेच प्रत्येक प्रकरणाचा एकमेकांशी संबंध लावण्याची अवघड जबाबदारी वाचकालाच पार पाडावी लागते
Please mark as brain list please