World Languages, asked by skmojeeb9, 8 days ago

* तुमच्या शब्दांत माहिती लिहा : (Write in your own words :) कावळ्या किल्ला.​

Answers

Answered by MizzFlorence
2

वरंधा घाटातील थरारक ट्रेकचा अनुभव देण्याकरता बराच मोठा असलेला कावळ्या किल्ला नेहमीच सज्ज असतो. श्री वाघजाई मंदिर, त्याच्या बाजूला असणाऱ्या पाषाणाच्या नऊ पाण्याच्या टाक्या, जोत्याचे, बुरुजांचे अवशेष हे सारे काही येथील समृद्ध इतिहासाची साक्ष देतात. देश व कोकण या भागांना जोडणाऱ्या या प्रदेशातील वरंधा घाट हा कावळ्या किल्ला पोखरूनच तयार केला आहे. गर्द हिरवळीने नटलेला, तीव्र उतार असलेल्या डोंगरावर वसलेला, अरुंद पायवाटांनी चोखाळलेला हा किल्ला म्हणजे ट्रेकर्ससाठी पर्वणीच. असा हा ऐतिहासिक पार्श्वभूमी व अप्रतिम सौंदर्य लाभलेला किल्ला हे पर्यटकांसाठी विशेष आकर्षण ठरू शकते.

Answered by shraddhasingh16908
4

Explanation:

Please make me as brainlist

Attachments:
Similar questions