टिपा लिहा :- जोडणारे दुवे
Answers
विद्यमान किंवा विलुप्त (निर्वंश) प्राणी आणि वनस्पती यांमध्ये काही अशा जाती, वंश, कुले किंवा गण आढळले आहेत की, त्यांच्या लक्षणांवरून ते इतर दोन संबंधित वंश, कुले किंवा गण यांच्यातील मध्यस्थ असावेत असा निष्कर्ष निघतो जणू काही ते त्या दोन्हींना जोडणारे दुवेच असावेत. कारण त्यांच्या लक्षणांमध्ये ज्या दोन्ही गटांना ते जोडतात त्यांच्या काही लक्षणांचे मिश्रण असते. त्यांपैकी जे जीव विलुप्त झाले असून फक्त जीवाश्मरूपांतच (शिळारूप अवशेषांतच) आढळतात त्यांना ‘हरवलेले दुवे’ व जे विद्यमान जीवांत आढळतात त्यांना ‘सजीव दुवे’ म्हणतात. पृथ्वीवर जीवांची अत्यंत जुनी अशी परंपरा असून ‘वर्तमान हे भूताचे अपत्य व भविष्याचे पितर आहे’. विद्यमान जीव प्राचीनांपासून क्रमाने विकास पावत [→ क्रमविकास] आले आहेत, या सिद्धांताला अनुसरून आजच्या जाती, वंश, कुले, गण
जोडणारे दुवे:
विद्यमान किंवा विलुप्त (निर्वंश) प्राणी आणि वनस्पती यांमध्ये काही अशा जाती, वंश, कुले किंवा गण आढळले आहेत की, त्यांच्या लक्षणांवरून ते इतर दोन संबंधित वंश, कुले किंवा गण यांच्यातील मध्यस्थ असावेत असा निष्कर्ष निघतो जणू काही ते त्या दोन्हींना जोडणारे दुवेच असावेत.