तोरणा किल्ल्याला शिवरायांनी कोणते नाव दिले?
Answers
Answer:
तोरणा अथवा प्रचंडगड म्हणजे पुणे जिल्ह्यातला दुर्गकोटातील अतिदुर्गम व अतिविशाल म्हणून हा गड प्रसिद्ध आहे. पुणे जिल्ह्याच्या वेल्हा तालुक्यातून गेलेल्या सह्याद्रीच्या रांगेतून दोन पदर निघून पूर्वेला पसरत गेलेले आहेत, त्यापैकी एका पदरावर तोरणा व राजगड आहेत. दुसऱ्या पदराला भुलेश्वर रांग असे म्हणतात. पुण्याच्या नैर्ऋत्येस असलेल्या पर्वतराजीमध्ये १८.२७६ उत्तर अक्षांश व ७३.६१३ पूर्व रेखांशावर हा किल्ला आहे. या गडाच्या दक्षिणेला वेळवंडी नदी असून उत्तरेला कानद नदीचे खोरे आहे. या गडाच्या पश्चिमेला कानद खिंड, पूर्वेला बामण व खरीव खिंडी आहेत. पुण्यापासून रस्त्याने तोरण्यापर्यंतचे अंतर ६० कि.मी. आहे.
1646 मध्ये, छत्रपती शिवाजीने वयाच्या सोळाव्या वर्षी हा किल्ला काबीज केला, त्यामुळे तो मराठा साम्राज्याच्या किल्ल्यांपैकी एक बनणाऱ्या पहिल्या किल्ल्यांपैकी एक बनला. शिवाजीने किल्ल्याचे नाव '' प्रचंडगड '' असे ठेवले आणि तोर्णा असे अनेक स्मारके आणि बुरुज बांधले.
#SAGARTHELEGEND