त्रपतूचकाचा सजीवांवर होणारा परिणाम स्पष्ट करा
Answers
Answer:
ऋतुचक्राचा सजीवांवर होणारा परिणाम :- मुलांनो, ऋतुचक्राचा सजीवांवर परिणाम होत असतो. उदा. उन्हाळ्यात आपण सुती कपडे घालतो तर हिवाळ्यात लोकरीचे उबदार कपडे घालतो. ऋतुचक्राचा मानवाप्रमाणेच इतर सजीवांवरही परिणाम होत असतो. पृथ्वीचा अक्ष कललेला नसता, तर पृथ्वीवर सगळीकडे आहे तीच स्थिती वर्षभर राहिली असती. म्हणजेच ऋतूंची निर्मिती झाली नसती. त्यामुळे वेगवेगळ्या अक्षांवर हवामानात बदल झाला नसता व एकाच तऱ्हेचे हवामान वर्षभर जाणवले असते. परंतु, पृथ्वीच्या कललेच्या अक्षामुळे पृथ्वीवर ऋतू, विविधता, बदल या बाबी घडतात. पृथ्वीवरील ऋतुचक्राचा मानवाबरोबर सर्व सजीवांवर परिणाम घडतो. उदा. आंब्याच्या झाडाला उन्हाळ्यात आंबे येतात, फणसही उन्हाळ्यात येतात, विशिष्ट ऋतुनुसारच शेती हंगामसुद्धा ठरतात. उदा. जून ते सप्टेंबर हा खरीप हंगाम यात भुईमूग, सोयाबीन, सूर्यफूल यांसारखी पिके घेतली जातात. तर ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा रब्बी हंगाम होय. यात गहू, हरभरा, बाजरी-ज्वारी यांसारखी पिके घेतली जातात.