Hindi, asked by harsha483629, 7 months ago

टप् टप् पडती अंगावरती प्राजक्ताची फुले
भिर् भिर् भिर् भिर् त्या तालावर गाणे अमुचे जुळे !
कुरणावरती, झाडांखाली ऊनसावली विणते जाळी
येतो वारा पाहा भरारा, गवत खुशीने डुले!
दूरदूर हे सूर वाहती, उन्हात पिवळ्या पाहा नाहती
हसते धरती, फांदीवरती हा झोपाळा झुले!
गाणे अमुचे झुळझुळ वारा, गाणे अमुचे लुकलुक तारा
पाऊस, वारा, मोरपिसारा या गाण्यातुन फुले!
फुलांसारखे सर्व फुलारे, सुरात मिसळुनि सूर, चला रे
गाणे गाती तेच शहाणे, बाकी सारे खुळे ! एका वाक्यात उत्तरे लिहा कवितेतील मुलाचे गाणे कधी जळून येते​

Answers

Answered by shahupayal102
3

जेव्हा प्राजक्ताची फुले अंगावर टप-टप् आवाज करत पडतात तेव्हा मुलांचे गाणे त्या भिर् भिर् तालावर जुळून येते.

Answered by qwstoke
0

कवितेतील मुलाचे गाणे कधी जळून येते

जेव्हा प्राजक्ताची फुले अंगावर टप-टप् आवाज करत पडतात तेव्हा मुलांचे गाणे त्या भिर् भिर् तालावर जुळून येते.

- " टप - टप पड़ती " या कवितेत कवि मंगेश पाड़गांवकर यांनी प्रजाक्ताच्या फुलांचे मोहक वर्णन वर्णन केले आहे. कविला वाटते सर्वांनी या फुलांसारखे फुलत रहावे, मोठे होत रहावे.

- सुरात सुर मिसळून सर्वांनी चालत रहावे. कविला वाटते गाणे गात राहणारे शहाणे असतात. जे गाणे गात नाहीत ते खुळे ठरतात. थोडक्यात सतत गाणे म्हणत राहण्याचा, आनंदी राहण्याचा आग्रह कविने केले आहे.

- कविचा मते रंगीबेरंगी फुलांचे ताटवे’ पाहून मन प्रसन्न होऊन जाते.फुलांच्या सुवासाने आजूबाजूचे वातावरण सुगंधित होते. त्या नाजूक, टवटवीत, गंधमिश्रित फुलांच्या दर्शनाने नयनसुख मिळते.

Similar questions