technology essay in Marathi
Answers
Answer:
मानवी जीवनाचा आणि उत्क्रांतीचा काळ हा खूप जुना असला तरी मागील शतकात लागलेले काही महत्त्वपूर्ण भौतिक आणि वैज्ञानिक शोध माणसाच्या विकासात कारणीभूत ठरलेले आहेत. मानवी जीवन हे खूप रहस्यमयी आहे. त्यामध्ये विज्ञान हे क्रांतीचे पाऊल म्हणावे लागेल. ते विज्ञान सहजरीत्या वापरण्यासाठी अनेक कौशल्ये आणि तंत्रांचा वापर करण्यात आला.
मानवी भौतिक आयुष्य हे सोयीस्कर बनवण्यासाठी जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञान विकसित झाले आहे. तंत्रज्ञान हा विज्ञानाचा कार्यभार म्हणता येईल. सर्व वैज्ञानिक नियम आणि दृष्टिकोन हे विविध तांत्रिक पद्धतीने उपयोगात कसे आणता येतील याचा अट्टाहास म्हणजेच आपण त्याला प्रगती समजतो. कोणतेही कार्य आज बसल्या बसल्या पूर्ण होऊ शकते. शारीरिक कष्टाचा कमीत कमी वापर करून माणूस गरजेची सर्व कामे चुटकीसरशी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने करू लागला आहे.
माणूस अन्न, पाणी, निवारा, वस्त्र याशिवाय जगू शकत नाही. तंत्रज्ञान या सर्व मूळ गरजांत देखील सहभागी होऊ लागले आहे. अन्ननिर्मितीपासून अन्नप्रक्रिया करण्यापर्यंत तंत्रज्ञान वापरले जाऊ लागले आहे. प्रक्रिया करून आज पाणी सहज स्वच्छ स्वरूपात उपलब्ध होत आहे. तसेच नवनवीन प्रकारची घरे व इमारती बांधण्यासाठी देखील तंत्रज्ञान वापरले जात आहे.