Physics, asked by xXItzcutekudiXx, 2 months ago

थोडक्यात माहिती लिहा
1) अहिल्याबाई होळकर.​

Answers

Answered by patilpratibha602
3

Answer:

अहिल्याबाई होळकर या केवळ एक महान शासकच नव्हे तर पराक्रमी योद्धा आणि सर्वश्रुत अश्या धनुर्धर देखील होत्या. अनेक युद्धांमध्ये साहसी योध्याप्रमाणे विचारपूर्वक निर्णय घेत त्यांनी युद्धाचे नेतृत्व केले आणि विजय संपादन केला. शिवाय अहिल्याबाई अश्या शासकांमधून एक होत्या ज्या आपल्या प्रांताच्या रक्षणार्थ व अन्याया विरुद्ध आक्रमण करण्यास कधीही मागेपुढे पाहत नसत.

महाराणी अहिल्याबाईंची ओळख मावळ प्रांताच्या राजमाता म्हणून होती, त्यांच्यातील अद्भुत साहसाला आणि अदम्य प्रतिभेला पाहून मोठ-मोठे राजे आणि प्रभावशाली शासक देखील आश्चर्यचकित होत असत. अहिल्याबाई महिलांच्या सशक्तीकरणाच्या बाजूने होत्या. स्त्रियांची परिस्थिती बदलण्या करता त्यांनी बरेच प्रयत्न केलेत.

विधवा स्त्रियांना त्यांचा हक्क मिळण्याकरता अहिल्याबाईंनी कायद्यात बदल करत विधवा महिलांना त्यांच्या पतीच्या संपत्तीत अधिकार मिळवून दिला व मुल दत्तक घेण्याचा हक्क देखील प्राप्त करून दिला. अहिल्याबाईंचे हृदय दया, परोपकार, निष्ठा या भावनांनी ओतप्रोत भरलेले होते, म्हणूनच करुणेची देवी…कुशल समाजसेविका…या प्रतिमेने त्यांना ओळखलं जात होतं.

Attachments:
Similar questions