History, asked by xXItzcutekudiXx, 1 month ago

थोडक्यात माहिती लिहा
1) दत्ताजी शिंदे




Answers

Answered by sujalrathodsujaloo5
1

Answer:

दत्ताजी शिंदे हे मराठ्यांचे शूर सेनापती होते. पानिपतच्या युद्धात नजीबखानाने त्यांना ठार मारले.[१]. मरण्याच्या आगोदर नजीबने त्यांना विचारले होते 'क्यूॅं मरहट्टे और लढोगे ?' त्यावर दत्ताजीने दिलेले 'क्यूॅं नही, बचेंगे तो और भी लढेंगे हे उत्तर अजरामर झाले आहे[२].

Explanation:

सच्चीतानंद शेवडेंच्या पानिपतचा रणसंग्राम ह्या पुस्तकात ह्याबद्दल संदर्भ सापडतो...१०जानेवारी १७६०साली झालेल्या यमुना नदीच्या काठावर बुराडी घाटात साबाजी शिंदे व नजीबखानात लढाई झाली..नाजीबखनाकडे जंबुरे(लहान तोफ) व लहान टप्प्याच्या बंदुका होत्या त्यामुळे साबाजीचे सैन्य पटापट मरू लागले.दत्ताजी शिंदे यांना ही वार्ता कळताच ते सहाय्याला धावून आले.दत्ताजीनी नजीब च्या सैन्याला बेटापालिकडे रेटत नेले..एवढ्यात नजीबाची नव्या दमाची फौज आली त्यांनी मराठ्यांवर गोळ्यांचा वर्षाव केला.नजीबखान आणि कुत्बशाह दोघेही हातात तलवार घेऊन दत्ताजी शिंद्यांच्याकडे झेपावले.बराच वेळ चकमक उडाली.जखमी होऊन पडलेल्या दत्ताजीना नजीबखानाने विचारले अजून लढशील का?त्या अवस्थेतही दत्ताजीनी ताडकन उत्तर दिले क्यू नही बचेंगे तो और भी लढेंगे..अखेरीस कुत्बशाह ने दत्ताजी शिंद्यांचा शिरच्छेद केला.राजाराम चोपदाराने शिंदे यांचा पार्थिव देह समारंगणातुनआणला नि यमुनानदीच्या काठी त्यावर अंत्यसंस्कार केले

Answered by rohitsuryawanshi987
2

Explanation:

this is the best of best answer this is a answers very nice

Attachments:
Similar questions