थे कयालेखन
खालील मृदयांच्या आधारे कथा लिखा
कथेला योज्य शीर्षक दया।
वृद्ध शेतकरी आयूष्यभर कर-पाच मूले-
शेती कामात लक्ष नाही शेतकयाला चिंता
घुक्ती करणे- प्रत्येकास एक काठी देऊन ती
मोडण्यास सांगणे-काठ्यांची माळी देऊन मोडण्यास
सांगणे मुलांना शिकवण-तात्पर्य
Guccluch
Answers
एकीचे बळ
एकदा एका गावात एक कष्टाळू शेतकरी राहत होता. आयुष्यभर त्याने शेतात राबून आपल्या पाचही मुलांना लहानाचे मोठे केले. पण मुलं मात्र आपसात भांडणारी होती. शेतकरी जसजसा म्हातारा होऊ लागला तशी त्याला मुलांची काळजी वाटू लागली. आपल्या मुलांना एकीने राहायला कसे शिकवावे याचा तो विचार करू लागला.
एक दिवस त्याने पाचही मुलांना २-२ काठ्या आणायला सांगितल्या. मुलांनी काठ्या आणल्यावर त्याने एकेक मुलाला एकेक काठी तोडायला सांगितली. प्रत्येक मुलाने एक एक काठी हाताने सहज तोडली. मग शेतकऱ्याने त्यांना उरलेल्या काठ्या एकत्र करून त्याची मोळी बांधायला सांगितली. मोळी बांधल्यावर त्याने प्रत्येक मुलाला ती हाताने तोडायला सांगितली. कुणालाच ती मोळी तोडता आली नाही.
शेतकऱ्याने मुलांना ह्यापासून बोध घ्यायला सांगितला की एकत्र रहाल तर कोणतंही संकट तुमच्या वाटेल जाणार नाही. वेगवगळे राहाल तर कोणीही येऊन तुम्हाला धोका देऊन जाईल. म्हणून कायम एकत्र रहा.
तात्पर्य : एकत्रित राहून काम केल्यास कोणालाही त्यात बाधा आणता येणार नाही. एकीचे बळ हे नेहमीच श्रेष्ठ असते.