Geography, asked by PragyaTbia, 1 year ago

दिलेल्या माहितीसाठी कोणत्या नकाशा पद्धतीचा वापर कराल?
जिल्ह्यातील गव्हाचे तालुकानिहाय उत्पादन.

Answers

Answered by chirag1212563
20

क्षेत्रघनी नकाशा

जिल्ह्यातील गव्हाचे तालुकानिहाय उत्पादनाची माहिती काढून घेण्यासाठी आपल्याला क्षेत्रघनी नकाशाची  मदत घ्यावी लागेल. त्या मागचे कारण हे की क्षेत्रघनी नकाशे काढताना घटकांचे मापन, सर्वेक्षण इ. बाबींचा प्रयोग करून सांख्यिकीय माहिती प्राप्त केली जाते. आणि विशेषतः अश्या प्रकारच्या नकाशात सर्व उपविभागांचे एकच मूल्य आखले जाते. ह्या पद्धतीला गृहीत धरून आपण जिल्ह्यातील तालुकानिहाय गव्हाचे उत्पादन केवढे हे सहज जाणून घेऊ शकतो.

Answered by gadakhsanket
12

★जिल्ह्यातील गव्हाचे तालुकानिहाय उत्पादन.

उत्तर- जिल्ह्यातील गव्हाचे तालुकानिहाय उत्पादन क्षेत्रघनी नकाशापद्धतीने करता येते. या नकाशांमध्ये भौगोलिक घटकांची आकडेवारी वेगवेगळ्या छाया किंवा छटांनी दाखवली जाते. हे नकाशे काढताना घटकांचे मापन सर्वेक्षण इत्यादी प्रक्रियेतून उपलब्ध झालेल्या सांख्यिकीय माहितीचा उपयोग केला जातो. यामध्ये प्रदेशाच्या प्रत्येक उपविभागासाठी घटकांचे एकच मूल्य दिलेले असते. प्रदेशातील उपविभागांच्या घटकातील कमीत कमी व जास्तीत जास्त मूल्ये विचारात घेतात. त्यानंतर त्यांचे साधारणतः ५-७ गटांत वर्गीकरण करतात. प्रत्येक गटानुसार एकच रंगछटा किंवा कृष्णधवल आकृतिबंध वापरले जातात.

धन्यवाद...

Similar questions