Geography, asked by PragyaTbia, 1 year ago

दिलेल्या माहितीसाठी कोणत्या नकाशा पद्धतीचा वापर कराल?
जिल्ह्यातील प्रदेशाच्या उंचीचे वितरण.

Answers

Answered by chirag1212563
21

समघनी नकाशे

समघनी नकाशांचा उपयोग एकाद्या  प्रदेशाची उंची, तापमान किंवा पर्जन्य ह्यांचे यथायोग्य आकलन करण्यासाठी होतो.चलाचे सलग वितरण दाखविण्यासाठी समघनी नकाशा उपयोगात आणला जातो. समघनी नकाशा रेखांकित करण्यासाठी ज्या पद्धतीचा उपयोग केला जातो त्याद्वारे कोणत्याही प्रदेशाची सुमारे उंची किती हे आपण सहज जाणू शकतो. समघनी नकाशे तयार करण्यासाठी त्या प्रदेशातील काही ठिकाणांची भौगोलिक दशा जसे ठिकाणांची उंची,पर्जन्य, तापमान यांची तपशीलवार माहिती गोळा करावी लागते. त्यानुसार आपण जिल्ह्यातील प्रदेशाच्या उंचीचे वितरण समघनी नकाशाद्वारे जाणून घेतो.

Answered by gadakhsanket
16
★ उत्तर - जिल्ह्यातील प्रदेशाच्या उंचीचे वितरण या माहितीसाठी समघनी नकाशा पद्धतीचा वापर करतात.

समघनी नकाशा तयार करण्यासाठी खालील टप्पे वापरले जातात.

●समघनी नकाशा काढताना घटकाचे जास्तीत जास्त व कमीत कमी मूल्य विचारात घेऊन वर्गांतर ठरवले जाते, जे रेषांमधील अंतर ठरवते.

●ठरवलेल्या वर्गांतरासाठी रेषा काढल्या जातात.त्यासाठी समान मूल्ये असलेल्या ठिकाणांना रेषेने जोडावे लागते.

अशाप्रकारे तयार केलेल्या नकाशाच्या आधारे खालीलप्रमाणे निष्कर्ष काढता येतात.

●सममूल्य रेषा जवळजवळ असतील ,तर घटकातील बदल तीव्र आणि एकमेकांपासून दूर असतील ,तर बदल सौम्य असतो.

●या नकाशामुळे घटकांच्या वितरणातील नैसर्गिक कल लक्षात येतो.

धन्यवाद...
Similar questions