दोन लगतच्या १ अंश अंतरावरील रेखावृतांमध्ये किती मिनिटांचा फरख असतो.
Answers
Answer:
रेखावृत्त:
पृथ्वीवर आपण कोणत्याही ठिकाणाची स्थानिक प्रमाण वेळ व स्थान व विस्तार निश्चित करण्यासाठी काही आडव्या आणि उभ्या अशा काल्पनिक रेषांचा वापर करतो.
यापैकी पृथ्वीवर उभ्या असलेल्या म्हणजेच उत्तर-दक्षिण जाणाऱ्या काल्पनिक रेषांना आपण रेखावृत्त असे म्हणतो.
रेखावृत्त बद्दल काही महत्वाच्या बाबी खालीलप्रमाणे आहेत.
१. पृथ्वीवरील कोणत्याही दोन बाजूच्या म्हणजेच लगतच्या रेखा वृत्तांच्या स्थानिक वेळेतील फरक हा चार मिनिटे असतो.
२. ०° अक्षवृत्तावर म्हणजेच विषुववृत्तावर कुठेही गेलो तरी शेजारील दोन रेखावृत्त मधले अंतर हे एकशे अकरा (१११) किलोमीटर एवढे असते. शेजारील किंवा लगतच्या दोन रेखावृत्त मधले सर्वात जास्त अंतर हे विषुववृत्तावर आढळते.
३. वरील प्रमाणे कर्कवृत्त व मकरवृत्त यावर कुठेही गेलो तरी म्हणजेच कोणत्याही ठिकाणी शेजारील किंवा जवळील दोन रेखावृत्त मधील अंतर हे एकशे दोन किलोमीटर एवढे असते.