दोन मोते गळली ,27 मोहरे हरवल्या आणि रुपये खुर्दा किती गेल्या यांची गणतीच नाही यांचा
अर्थ पानिपतच्या युद्धाशी आहे तो तुम्ही लिहा
Answers
Answer:
आधुनिक युद्धशास्त्राचे प्रवर्तक,'नेशन स्टेट'सदृश संकल्पना मांडणारे आणि मायभूमीपासून हजारो किलोमीटर दूर पानिपत इथं झालेल्या युद्धात अतुलनीय शौर्य दाखवणारे योद्धा म्हणून सदाशिवराव भाऊ यांची इतिहासाला ओळख आहे.
पानिपतच्या तिसऱ्या लढाईत अफगाणिस्तानच्या अहमद शाह अब्दालीने मराठा सैन्याचा पराभव केला. या युद्धात मराठा सैन्याची अपरिमित जीवितहानी झाली. या पराभवाने मराठ्यांच्या वर्चस्वावर, राजकीय वाटचालीवरही परिणाम झाला आणि सदाशिवराव भाऊ या पराजयाचे धनी ठरले.
चिमाजी अप्पांचे चिरंजीव असलेल्या सदाशिवरावांचं आयुष्य जेमतेम तीस वर्षांचं. पेशवाईच्या कालखंडातलं अल्प पण निर्णायक पर्व. सदाशिवरावांच्या नेतृत्वात लढल्या गेलेल्या पानिपताच्या लढाईत मराठा सैन्याला पराभवाला सामोरं जावं लागलं. मात्र त्यांनी दाखवलेल्या शौर्याचं उदाहरण आजही दिलं जातं. एका दिवसात खरंतर काही तासात मराठी सैन्याने सेनापती, सैन्य आणि प्रचंड प्रमाणावर माणसं गमावली.