दुर्ग भगवांता यांनी लिहिलेल्या ललित लेख संग्रह चे नाव सांगा
Answers
Answer:
दुर्गा भागवत (जन्म : इंदूर, १० फेब्रुवारी १९१०; मृत्यू : मुंबई, ७ मे २००२) या मराठी लेखिका होत्या. ९२ वर्षांचे दीर्घायुष्य त्यांना लाभले. वैविध्यपूर्ण साहित्यप्रकारात त्यांचे मोठे योगदान आहे. यांत लोकसाहित्य, बालसाहित्य, बौद्धसाहित्य, कथा, चरित्र, ललित, संशोधनपर, समीक्षात्मक, वैचारिक लेखन यांचा समावेश होतो. त्यांना फ्रेंच, जर्मन, इंग्रजी, संस्कृत, पाली या भाषा चांगल्या अवगत होत्या. त्यांचे संस्कृत, पाली आणि इंग्लिश भाषेमध्येही लेखन आहे.संशोधन व साहित्य या क्षेत्रात रमणाऱ्या दुर्गाबाईंना पाककलेतही रुची होती. पाकशास्त्रात त्या पारंगत होत्या. त्यांनी काही नवीन पाककृतीही तयार केल्या आहेत. त्या विणकाम, भरतकामही उत्तम करत. दुर्गाबाई अविवाहित होत्या, घरातील कामात त्यांना विशेष आवड होती.
.पैस", "ॠतुचक्र", "डूब", "अशा ललित लेखांच्या पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे. बाणभट्टाची "कादंबरी","जातककथा", यांचा अनुवाद करणाऱ्या दुर्गाबाईंनी थोरो या अमेरिकन विचारवंताच्या पुस्तकाचा " वॉल्डनकाठी विचारविहार "नावाचा अनुवादही केला. रवींद्रनाथ टागोरांच्या "गीतांजली"चा संस्कृतात अनुवाद करण्याचे कौतुकास्पद कार्य दुर्गाबाईंनी केले. त्यांनी भाषांतरित केलेली आणि सरिता प्रकाशन, पुणे यांनी प्रकाशित केलेली 'लोककथामाला' मराठीतील लोककथा आणि बालकथा यांमधला महत्त्वाचा ठेवा आहे.