India Languages, asked by TransitionState, 11 months ago

दूरचित्रवाणी, दूरदर्शन, शाप की वरदान, माहिती, निबंध, भाषण |...

Answers

Answered by halamadrid
6

Answer:

आजच्या युगात दूरदर्शन ही एक आवश्यकता बनली आहे.दूरदर्शनामुळे आपल्याला जगभरच्या बातम्या घर बसल्या समझतात. वेगवेगळ्या देशांबद्दल माहिती मिळते.विविध खेळांचे थेट प्रसारण पाहायला मिळते. यावर आपण वेगवेगळे नाटक व सिनेमा पाहू शकतो.नॅशनल जॉग्रफिक आणि डिस्कवरी अशा वाहिन्यांमुळे आपल्याला जगाबद्दल माहिती मिळते.दूरदर्शनामुळे आपल्याला नवनवीन चित्रपट व गाणि पाहायला मिळतात,ज्यामुळे आपले मनोरंजन होते.दूरदर्शनामुळे आपला एकटेपणा दूर होतो.

पण दूरदर्शनाचे तोटेही आहेत.दूरदर्शन जास्त वेळ बघितल्यामुळे आपल्या डोळ्यांची दृष्टी खराब होण्याची भीती असते.लहान मुले त्यांचा अभ्यास विसरून दूरदर्शन पाहत राहतात,त्यामुळे त्यांचा अभ्यास होत नाही व फक्त एका जागेवर बसून असल्यामुळे काही शारीरिक व्यायामसुद्धा होत नाही.दूरदर्शनावरील काही हिंसात्मक आणि गुन्हे दाखवणाऱ्या कार्यक्रमांमुळे लोकांच्या मनावर नकारात्मक प्रभाव पडतो.

प्रत्येक गोष्टीचे फायदे व तोटे असतात,तसेच दूरदर्शनाचेही आहेत. आता हे आपल्यावर आहे की आपण त्याचा वरदान म्हणून उपयोग करतो की शाप म्हणून.

Explanation:

Answered by ItsShree44
2

Answer:

दूरचित्रवाणीचा प्रसार मुख्यतः शहरांतून मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. तरीही काहीजणांना दूरचित्रवाणी हा शाप वाटू लागला आहे. असे का बरे? दूरचित्रवाणीच्या प्रलोभनातून काही धोके जरूर संभवतात. शहरात जागेची समस्या फारच बिकट असल्याने, विशेषतः चाळीतील व झोपडपट्टीतील लोक दूरदर्शनवरील कार्यक्रम अगदी जवळून पाहत असल्यामुळे, त्याचा त्यांच्या दृष्टीवर अनिष्ट परिणाम झाल्याशिवाय राहत नाही. कार्यक्रम पाहण्यासाठी लहान जागेत खूप माणसे तासन्तास बसतात, हेही आरोग्याच्या दृष्टीने विघातक आहे. टीव्हीवर दाखवल्या जाणाऱ्या विविध वाहिन्यांवरील चित्रपटांमुळे मुले क्रीडांगणाला दुरावली, ग्रंथवाचनाला पारखी झाली. टीव्हीवर कार्यक्रम पाहताना कुणी पाहुणे आले, तर त्यांचे यथोचित स्वागत होत नाही. दूरचित्रवाणीवरील बहुसंख्य कार्यक्रम हे चित्रपटांवर आधारित असतात. त्यामुळे युवावर्ग त्या आभासामागे धावतो व वास्तवाला पार विसरून जातो. विविध कार्यक्रमांतून जाहीर केलेली मोठमोठ्या किमतीची बक्षिसेही त्याला स्वप्ननगरीत नेतात आणि प्रामाणिक प्रयत्नांचे व कष्टांचे महत्त्व त्याला वाटेनासे होते.

वास्तविक पाहता दूरचित्रवाणी हे ज्ञानप्रसाराचे प्रभावी माध्यम आहे. खेड्यांतील शेतकऱ्याला, मजुराला त्यांच्या विविध उपयुक्त अशा व्यवसायांचे ज्ञान देता येईल. आज आपल्यापुढे प्रौढ शिक्षणाचा यक्षप्रश्न उभा आहे. हा प्रश्न सोडवण्यास दूरचित्रवाणीची मोलाची मदत होईल. ज्ञानप्राप्तीत केवळ श्राव्यापेक्षा दृक्-श्राव्य साधन अधिक परिणामकारक ठरते. 'दूरदर्शन'मध्ये तर दृक् व श्रुती दोहोंचाही समन्वय आहे. या साधनांच्या मदतीने साऱ्या जगाचा फेरफटका आपल्याला घरबसल्या करता येतो. तज्ज्ञांकडून मार्गदर्शन, परराष्ट्रीय नेत्यांच्या भेटींच्या घटना, जगात चाललेल्या विविध खेळांच्या स्पर्धा या सर्व गोष्टींचा लाभ आपल्याला दूरचित्रवाणीमुळे घरी आरामात बसून घेता येतो. हजारो वर्षांपूर्वी लिहिले गेलेले रामायण, महाभारत हे ग्रंथ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचले ते दूरचित्रवाणीमुळेच ना!

अशा या दूरचित्रवाणीला शाप समजून दूर लोटणे योग्य होणार नाही. मात्र दूरचित्रवाणीचे कोणते कार्यक्रम पाहायचे याबद्दल कुटुंबातील वडीलधाऱ्या माणसांनी तारतम्याने विचार करणे आवश्यक आहे. अभ्यासाला पूरक ठरणारे कार्यक्रम विदयार्थ्यांनी अवश्य पाहावेत. 'आधी अभ्यास, मग मनोरंजन' हे पथ्य मात्र दूरदर्शनवरील इतर कार्यक्रमांच्या बाबतीत अवश्य पाळावे. असे झाल्यास दूरदर्शन आपल्याला मोठे वरदानच ठरणार आहे, यात शंका नाही.

Similar questions