दहावी निरोप समारंभ मनोगत
Answers
सुरवंटांचे झाले पाखरू, सर्वत्र लागले भराऱ्या मारू.
नवे जग, नव आशा, शोध घेण्याची जबर मनिषा ।
याच शाळेने लावले वळण, त्यांवर चढू यशाची चढण ॥
हे वळण लावण्यासाठी, गुरूजनांनी अविरत कष्ट घेतले. शिक्षकांनी आमच्या अज्ञानावर त्यांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा, संस्कृतीचा लेप दिला. मनाच्या कोऱ्या करकरीत पाटीवर समतेचे,ममतेचे धडे गिरविले. आणि आज ती पाटी ज्ञानरत्नांनी शिगोशिग भरलेली आहे. शिस्तीशिवाय आयुष्य म्हणजे होकायंत्राशिवाय जहाज ! म्हणूनच, आमच्या जीवनाचा कटीपतंग न होण्यासाठी त्याने प्रेमाने शिस्तीचाही डोस पाजला. हे सर्व करताना त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला एकाच मापात तोलले नाही. प्रत्येक दगडातील देव शोधून त्यांवर सद्विचारांचे घाव घातले. आणि त्या दगडाला ज्याच्या, त्याच्या गुणवैशिष्टयाप्रमाणे देवाचे रूप दिले. उदाहरणच द्यायचं झालं तर नटराजाच्या मुर्तीलाही आकार मिळाला. शाळेने फक्त हुशार विद्यार्थ्यांचीच रास निर्माण केली नाही, तर उत्कृष्ट कलाकार व उत्तमोत्तम खेळाडूही निर्माण केले.
माझ्या मनात आज रूंजी घालत आहेत ती शाळेतील व्याख्याने, नाटयवाचने, एकांकिका बसवणे, प्रदर्शनाचे तक्ते, वक्तृत्व स्पर्धा ते सत्कार. इतकेच काय, माझ्यासाठी सर्व शक्ती पणाला लावणारे माझे गुरूजन. ते जिंकणे ………….. ते हरणे …….. ! व्यक्तीमत्वाला पैलू पडले ते इथेच. कांहीच घडण ….. कांहीच बिघडणं ………. सारंच निरूपद्रवी आणि सर्वांत शेवटी तथास्तु म्हणून दिलेला आदर्श विद्यार्थीरूपी आशिर्वाद !
शिक्षक दिनी मुख्याध्यापक होताना अवघ्या 3-31/2 तासात शिक्षकांचे कष्ट, त्यांचे प्रयत्न लक्षात आले आणि म्हणूनच ठरवलं की सागरात पोहण्याचा आत्मविश्वास देणाऱ्या शाळेचे आभार मानण्याची आजची ही संधी ! नव्या क्षितिजांना साद घालताना जुन्या क्षितीजांना अभिवादन करणे, त्यांचे आशिर्वाद घेणे हीच आपली संस्कृती. म्हणूनच, या संस्कृतीचा पाईक असणारी मी ही काटयांप्रमाणे बोचणारी स्मृतीची फुले मनात साठवत शालेय विद्यार्थी म्हणून या स्टेजवरचे शेवटचे भाषण देताना माझ्यासाठी झटणाऱ्या सर्व ज्ञात-अज्ञात शिक्षकांना, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शतश: अभिवादन करतो आणि स्पष्ट करतो कीं,या मंदिरात उभारलेल्या पायावर माझी उत्तम माणुसरूपी इमारत नक्कीच उभी राहील आणि माझ्या यशाचा, सत्कार्याचा सुगंध सदैव या शाळेला प्रफुल्लीत करेल. या शाळेतून माझ्या व्यक्तीमत्वाचं, छोटया कुंडीतून मोठया जमिनीत लावण्यासाइी आणि म्हणूनच शेवटाला एवढेच म्हणेन,
बालपणीचे दिवस सुखाचे,
आठवती घडी घडी
आठवणींना आठवणींची,
वाहतो ही शब्दसुमनांची जुडी.
बालपणीचे सखे सोबती,
आठवणींना अजुन झोंबती.
कांही गुरूजन कांही सवंगडी,
या सर्वांनी विविध गुणांनी
जशी घडवली तशीच घडली,
आयुष्याची घडी.
आणि म्हणूनच,
वाहिली ही शब्दसुमनांची जुडी.
hope this helps you
Answer:
शालान्त पूर्वपरीक्षेचा निकाल जाहीर झाल्यावर लगेच दुसऱ्या दिवशी आमच्या शाळेने निरोप समारंभ आयोजित केला होता. समारंभासाठी सायंकाळी बरोबर पाच वाजता मी शाळेत गेलो. शाळा आज मला वेगळीच भासत होती. प्रवेशद्वारापुढे शोभिवंत रांगोळी रेखाटली होती आणि सारे शिक्षक आम्हां विदयार्थ्यांच्या स्वागतासाठी उभे होते. त्यांच्या या स्वागतानेच आम्ही सारे भारावून गेलो. सभागृह आज नव्या नवलाईने नटलेले दिसत होते. आजवर ज्यांनी शाळेस उत्कृष्ट यश मिळवून दिले, अशा गुणवंत विदयार्थ्यांची छायाचित्रे सभोवताली स्टँडवर लावून ठेवलेली होती. केवढी कल्पकता होती त्यात ! या साऱ्या प्रतिमा आम्हांला जणू प्रेरणा देत होत्या. तुम्हांलाही असेच यश मिळवायचे आहे, शाळेचा लौकिक वाढवायचा आहे - असेच जणू त्या आम्हांला सुचवत होत्या. जागोजागी निशिगंधाच्या व गुलाबाच्या फुलांची आरास केल्यामुळे सारे वातावरण सुगंधित झाले होते.
ठरल्या वेळी कार्यक्रमाला सुरुवात झाली. आमचे जिल्हाधिकारी निरोप समारंभाचे प्रमुख पाहुणे होते. मुख्याध्यापकांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला, तेव्हा एक सुखद धक्का बसला. कारण जिल्हाधिकारी आमच्याच शाळेचे माजी विदयार्थी होते व त्यांचे नाव शाळेच्या सन्माननीय विदयार्थ्यांच्या यादीत झळकत होते ! निरोप समारंभाचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे या समारंभात भाषणांची आतषबाजी नव्हती. आमच्या बॅचने गेल्या दहा वर्षांत मिळवलेल्या यशाचा आढावा मुख्याध्यापकांनी मोजक्या शब्दांत घेतला. पाहुण्यांनीही अगदी मोजक्या शब्दांत आपल्या जीवनातील यशाचे श्रेय शाळेकडे कसे जाते, हे विनम्रपणे सांगितले. विद्यार्थी आणि शिक्षक यांच्याकडून एकमताने निवड झालेल्या आदर्श विदयार्थ्यांचा पाहुण्यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर विदयार्थ्यांना भाषण करण्यास पाचारण करण्यात आले. पण नेहमी वक्तृत्वस्पर्धा गाजवणारे सारे फर्डे वक्ते आज भारावले होते. त्यांच्या कंठांतून शब्दच फुटत नव्हते. सारेच वातावरण गंभीर झाले होते. सगळ्यांच्याच डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या.
हा वातावरणातील उदास गंभीरपणा निवळावा, म्हणून काही गमतीदार खेळ सुरू करण्यात आले व नंतर अल्पोपाहाराच्या कार्यक्रमाने समारंभाची सांगता झाली. समारंभ संपला तरी आमचे पाय शाळेतून निघत नव्हते. या वास्तूशी आमच्या शालेय जीवनातील अनेक स्मृती निगडित झालेल्या होत्या. त्या स्मृतींना उजाळा देत गुरुजनांचा आणि मित्रांचा निरोप घेऊन मी शाळेबाहेर पाऊल टाकले. क्षणैक मागे वळून पाहिले. डोळ्यांतून ओघळणाऱ्या अश्रृंमुळे शाळेचा सारा परिसर अंधुक दिसत होता. शालेय जीवनातील ते 'सुंदर दिन हरपले !' या विचाराने ऊर दाटून आला होता.