धर ध्वजा करी एक्याची | मनीषा जी महाराष्ट्राची या ओळींचे रसग्रहण करा
Answers
Answer:
नमस्कार मित्रांनो,
सदर प्रश्न कुमारभारती (९ वी) या पाठ्यपुस्तकातील "महाराष्टारावरूनी ताक ओवाळून काया" या कवितेतील आहे. या कवितेचे कवी अण्णाभाऊ साठे आहेत. आपल्या ओघवत्या लोकभाषेतून हि काव्यरचना कवींनी केली आहे. यामधून त्यांचे आपले महाराष्ट्राच्या मराठी मातीवर असणारे प्रेम शब्दाशब्दातून दिसते.
★ काव्यसौंदर्य.
(अ) ‘धरध्वजा करी ऐक्याची । मनीषा जी महाराष्ट्राची’
उत्तर- आज संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकारले आहे. या महाराष्ट्राची भूमी सोन्याची आहे. येथे विविधतेत एकता आहे. ही ऐक्याची ध्वजा तू हाताशी धर हि इच्छा महाराष्ट्राची आहे.
(अा) कवितेतून व्यक्त होणारा रस.
उत्तर- या कवितेतून हि भूमी वीर जवानांची धाडसी शासनकर्त्यांची आहे हे दिसून येते. प्रत्येक महाराष्ट्रीय माणसाला स्फूर्ती देणारे हे काव्य आहे. शिवाजी महाराजांचे कार्य सांगणारे पोवाडे अनेकांना स्फूर्ती देऊन जातात.
धन्यवाद...