TU २) वाळवंटी प्रदेशात नदीचे कार्य इतर कारकापेक्षा प्रभावी असते.
Answers
Answer:
वाळवंटी प्रदेश). वाळवंट म्हणजे पृथ्वीच्या भूपृष्ठभागावरील असा अतिकोरडा प्रदेश, की जेथे वनस्पती व प्राणिजीवन अत्यंत विरळ असते. सामान्यपणे शुष्क, ओसाड व वालुकामय भूमीला वाळवंट म्हणून ओळखले जात असले, तरी तांत्रिक दृष्ट्या वसाहतीच्या दृष्टीने अतिथंड प्रदेशांचाही यात समावेश केला जातो. जीवनोपयोगी साधनांच्या अभावामुळे हे प्रदेश निर्जन बनले आहेत. उष्ण वाळवंटी प्रदेशांनी पृथ्वीच्या भूभागापैकी १८% तर थंड वाळवंटांनी १६% भाग व्यापलेला आहे. पहिल्या प्रकारात आफ्रिकेतील मध्य सहारा व नामिब वाळवंट, इथिओपिया व येमेन (साना) यांचा किनारी प्रदेश, सौदी अरेबियातील रब-अल्-खली, मध्य आशियातील ताक्लामाकान; पेरू व चिलीमधील आटाकामा वाळवंट तसेच अमेरिकेच्या संयुक्त संस्थानातील कॅलिफोर्नियाचा व उत्तर मेक्सिकोचा काही भाग यांचा समावेश होतो. हवामान, स्थानिक वनस्पती, भूरूपे, जलस्वरूप व मृदा यांच्या वैशिष्ट्यांनुसार अशा कोरड्या वाळवंटाचे वेगवेगळे प्रकार आढळतात.
वाळवंटी प्रदेशांची कालानुरूप स्थित्यंतरे
कमी पर्जन्य हा पृथ्वीवरील सर्वच वाळवंटांत आढळणारा सामान्य घटक असला, तरी प्राकृतिक आणि भूविज्ञानदृष्ट्या त्यांच्यात बरीच भिन्नता आढळते. त्यांच्या निर्मितीचा काळ वेगवेगळा आहे. काही वाळवंटे लक्षावधी वर्षांपूर्वीपासून निर्माण झालेली आहेत, तर काही वाळवंटांमध्ये प्लाइस्टोसीन कालखंडाच्या अखेरपासून (गेल्या सु. दहा हजार वर्षांत) आमूलाग्र बदल झालेले आढळतात.
पुराजीव महाकल्पात (६० कोटी ते २४.५ कोटी वर्षांपूर्वी) सहारा व ऑस्ट्रेलियन वाळवंट यांचा काही भाग हिमाच्छादित होता. सर्व वाळवंटी प्रदेशांच्या भूपृष्ठाखाली आढळणाऱ्या प्राचीन खडकांवरून पूर्वी हे प्रदेश समृद्ध असावेत. यांमध्ये काही ठिकाणी सागरी चुनखडी व वालुकाश्म आढळतात. त्यांपैकी मध्यपूर्वेत व इतर काही ठिकाणी खनिज तेल व नैसर्गिक वायूंचे साठे आढळतात; तर काही प्रदेशांत आढळणाऱ्या कोळसाक्षेत्रावरून ते प्रदेश प्राचीन काळी पाणथळ व भरपूर वनस्पतींचे आच्छादन असलेले असावेत.
द्रवरूप सिलिकायुक्त पदार्थ (लाव्हा) थंड झाल्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावर किंवा अंतर्गत भागात निर्माण झालेल्या वेगवेगळ्या प्रकारचे स्फटिकमय खडक अनेक भागांत आढळले आहेत. चतुर्थ कालखंडात (सु. २० लाख वर्षांपूर्वी) जलवायुस्थितीत खूपच बदल झालेले दिसतात. मोठ्या सस्तन प्राण्यांच्या शिकारीसाठी वापरण्यात आलेली मानवनिर्मित हत्यारे अल्जीरियन सहारामध्ये आढळली आहेत. मध्य सहारातील तिबेस्तीसारख्या उच्चभूमीच्या प्रदेशात पूर्वी ओक व सीडार वृक्षांची अरण्ये होती. कालाहारी, इराणचे वाळवंट व पश्चिम संयुक्त संस्थानातील वाळवंटात एकेकाळी मोठी सरोवरे होती. सध्याच्या तुलनेत जगातील अनेक वाळवंटी प्रदेशांत पूर्वी बरेच आर्द्र हवामान होते. लिबियातील लेप्टस मॅग्ना येथे काही हजार प्रेक्षक बसू शकतील असे प्रचंड प्रेक्षागृह होते, असे आढळले आहे. यावरून पूर्वी येथे खूप मनुष्यवस्ती असावी. सध्या हा भाग ओसाड आहे.
प्राचीन काळापासूनच ओसाड प्रदेश मानवी जीवनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरलेले आहेत. मौंट कार्मेल (इझ्राएल) जवळचा प्रदेश, सिरिया-लेबानन सरहद्दीवरील मौट हरमानचा परिसर व जॉर्डन खोरे या भागांत इ. स. पू. सु. ६००० वर्षांपूर्वीपासून तृणधान्यांचे उत्पादन केले जात असल्याचे, तसेच या प्रदेशातील शेतीसाठी जलसिंचन व्यवस्था व ईजिप्तमधील नाईल नदीच्या पाण्याचा केला जाणारा बारमाही उपयोग इ. दाखले मिळतात. त्याचप्रमाणे टायग्रिस-युफ्रेटीस नद्यांच्या खोऱ्यांतील सुपीक प्रदेशात व बलुचिस्तानमधील सिंधू नदीच्या खोऱ्यांत सु. ५,००० वर्षांपूर्वी मानवी संस्कृती भरभराटीस आल्या असल्याचे आढळले आहे. अशा प्राचीन वसाहती व भूमि-उपयोजनांचे दाखले काही वाळवंटी प्रदेशांत व इराणमध्येही आढळले आहेत. पाणीपुरवठ्यासाठी खोदलेल्या बोगद्यांच्या कमानी तेथे आढळल्या आहेत. उत्तर व दक्षिण अमेरिकेत मानवाचे आगमन बरेच उशिरा झाले. कालमापनाच्या किरणोत्सर्गी कार्बन - १४ तंत्रानुसार १२,००० ते १५,००० वर्षांपूर्वी पश्चिम गोलार्धात मनुष्यवस्ती असल्याचे दाखविता आलेले नाही. मेक्सिको सिटीजवळ मात्र प्राचीन काळी मनुष्यवस्ती असावी असे दिसते. जुन्या व नव्या अशा दोन्ही जगातील मानवी विकासाच्या इतिहासावरून एक आश्चर्यकारक गोष्ट अशी दिसते की, सभोवतालच्या भरपूर पाणी असलेल्या प्रदेशापेक्षा तो ओसाड प्रदेशाकडेच अधिक आकर्षिला गेला आहे.