tundra pradesh information in marathi of pranijivan
Answers
Answer:
अल्पकालिन उन्हाळा व दीर्घकाळ हिवाळा किंवा तापमान कमी असलेल्या प्रदेशातील परिसंस्था. या परिसंस्थेत पाणी या घटकापेक्षा तापमान हा घटक प्रभावशाली असतो. यामुळे वनस्पतींची वाढ खुंटलेली असते. यामध्ये विशिष्ट प्रकारच्या वनस्पती आणि हवामान यांचे प्राबल्य असते. त्यामुळे या परिसंस्थेचा उल्लेख ‘टंड्रा जीवसंहती’ असाही केला जातो. भूपृष्ठाचा दहावा हिस्सा टंड्रा प्रदेशाने व्यापलेला आहे. टंड्रा परिसंस्थेचे सामान्यपणे तीन प्रकार आहेत : आर्क्टिक टंड्रा, अंटार्क्टिक टंड्रा, अल्पाइन टंड्रा. जैविक क्रियांना पुरेसे तापमान वाढत नसल्याने टंड्रातील वनस्पती, प्राणी व लोकसंख्या मर्यादित असते. टंड्रा परिसंस्थेत खुरटी झुडपे, गवते, यकृतका (लिव्हरवर्ट), हरिता (मॉस) आणि दगडफूल (लायकेन) वनस्पती असतात. काही टंड्रा परिसंस्थेत वृक्ष विखुरलेल्या अवस्थेत वाढलेले दिसतात. टंड्रा आणि त्या नजिकच्या वनांमधील सीमारेषेला ‘वृक्षरेषा किंवा तरुरेषा’ म्हणतात.
आर्क्टिक टंड्रा : हा प्रदेश उत्तर ध्रुवाजवळील तैगा प्रदेशात आहे. या प्रदेशातील भूमी वर्षभर गोठलेली असते. म्हणून या भूमीला नित्यगोठीत भूमी म्हणतात. या भूमीत उत्तर रशिया आणि कॅनडा या देशांतील मोठ्या प्रदेशाचा समावेश होतो. या प्रदेशात वृक्षांची वाढ होणे जवळजवळ अशक्य असते. येथील उघड्या व खडकाळ भूमीवर हरिता आणि दगडफूल यांसारख्या वनस्पती वाढतात. या ठिकाणी फक्त हिवाळा आणि उन्हाळा हे मुख्य ऋतू असतात. हिवाळ्यात या प्रदेशात तीव्र थंडी आणि काळोख असून या काळात तापमान २८० से. असते. काही वेळा ते ५०० से.पर्यंत खाली उतरते. उन्हाळ्यात येथील तापमान थोडेसे वाढते. त्यामुळे बर्फाचा वरचा थर वितळतो आणि जमिनीवर दलदल व डबकी तयार होऊन पाण्याचे प्रवाह वाहतात.
आर्क्टिक टंड्रा प्रदेशात जैवविविधता कमी आहे. येथे सु. १,७०० संवहनी वनस्पती आणि केवळ ४८ जातीचे सस्तन प्राणी आहेत. याखेरीज लाखो पक्षी या प्रदेशात स्थलांतर करीत असतात. हिमघुबड, कॅरिबू (रेनडियर), कस्तुरी बैल, हिमससे, हिमखोकड आणि ध्रुवीय अस्वले टंड्रा प्रदेशात लक्षणीय संख्येने आढळतात. या प्रदेशात एस्किमो (इन्युइट) या मुख्य रहिवाशांशिवाय लॅप, सॅमॉइड, तुंगू, येकूस्त, गिल्याक इ. जमातींचे लोक असून रेनडियरचे कळप पाळणे, शिकार करणे व मासेमारी करणे हे त्यांचे व्यवसाय आहेत. या भागात तेल आणि युरेनियमचे साठे असले तरी येथील खडतर वातावरणामुळे मानवी कृतींचा अभाव आहे.
...