'Unhalyachi sutti kashi ghalavnar ' essay in marathi
Answers
Answer:
शाळेत असताना उन्हाळ्याच्या सुट्टीची घोषणा झाल्यावर सगळी मुले खूप खुश व्हायची.कधी वार्षिक परीक्षा संपणार,आणि कधी सुट्टी मिळणार असे सगळ्यांना वाटायचे. मग आपण सुट्टीत काय काय करू,याचा विचार सगळे करायचे.
उन्हाळ्याच्या सुट्टीत दरवर्षी मी माझ्या गावी कोकणात राहायला जाते.तिकडचे निसर्गमय वातावरण मला फार आवडते.यावेळी सुट्टीत काहीतरी वेगळे करावे असे मला वाटते.
यावेळी उन्हाळ्याच्या सुट्टीत मी माझ्या कुटुंबासोबत भुवनेश्वरला जायचे ठरवले आहे.तिथे आम्ही विमानाने जाणार आहोत.पहिल्यांदा विमानाने प्रवास करणार असल्यामुळे,मी खूप उत्साहित आहे.आम्ही तीन दिवसांसाठी तिथे जाणार आहोत.तिकडचे प्रसिद्ध ठिकाण जसे जगन्नाथ मंदिर,कोणार्क सूर्य मंदिर,चंद्रभागा समुद्रकिनारा,चिल्का सरोवर,नंदनकनन पार्क,पुरी समुद्रकिनारा यांना आम्ही भेट देऊ.
मी माझ्या या भुवनेश्वर यात्रेची आतुरतेने वाट पाहत आहे.
तसेच यावेळी सुट्टीत मी पोहण्याचे क्लास सुद्धा लावणार आहे.तिथे मी माझ्या मैत्रिणींसोबत पोहायला शिकेल.आम्ही तिथे फार मजा करू.
अशा प्रकारे,यावेळीची उन्हाळ्याच्या सुट्टी मी नवीन गोष्टी शिकण्यात आणि आनंदात घालवणार.
Explanation: