उपलब्ध पुराव्यांचे चिकित्सा पूर्वक संशोधन करून घटनांची मांडणी करणाऱ्या लेखन पद्धतीला----- असे म्हणतात.
1 point
लेखन शैली
इतिहासाची साधने
निरीक्षण पद्धती
इतिहास लेखन
Answers
Answer:
इतिहासलेखनपद्धति : प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंत उपलब्ध पुराव्यांवरून त्या त्या काळातील मानवी प्रयत्न, सामाजिक जीवनातील घडामोडी व परिस्थिती यांविषयी स्थळ, काळ व व्यक्ती यांच्या निर्देशांसह जे लेखन केले जाते, त्यास इतिहासलेखन म्हणतात. इतिहासलेखनास प्रथम केव्हा सुरुवात झाली हे ज्ञात नाही तथापि ईजिप्त, ॲसिरिया, बॅबिलोनिया, चीन वगैरे देशांत इ. स. पू. १५०० पासून पुढे इतिहासविषयक काही लेखन केलेले आढळते. त्यांत राजांच्या कुळी, त्यांचे पराक्रम व तत्संबंधित माहिती ग्रथित केलेली आहे. बहुतेक लेखनावर तत्कालीन धर्माचे वर्चस्व आढळते आणि बहुसंख्या लेखन शिलालेख, मृत्पात्रे, भाजलेल्या मातीच्या विटा व पपायरसे (ईजिप्तमधील कागद), भूर्जपत्रे, ताडपत्रे, कातडी ह्यांवर लिहिलेले असून गद्यापेक्षा पद्याचा त्यात अधिक उपयोग केलेला आहे. मात्र शास्त्रशुद्ध इतिहासलेखनाऐवजी पुराणकथा व दंतकथांचाच त्यात अधिक भरणा आढळतो. त्यामुळे वरील इतिहासलेखनावरून तत्कालीन समाजाची, त्यांच्या चालीरीतींची व धार्मिक कल्पनांची माहिती मिळत असली, तरी तत्कालीन राजकीय घडामोडींची विश्वसनीय माहिती उपलब्ध होत नाही. म्हणून ज्याला खऱ्या अर्थाने इतिहासलेखन म्हणता येईल, असे लेखन प्रथम ग्रीसमध्ये व नंतर रोमन संस्कृतीच्या काळात सुरू झाले.
ग्रीक व रोमन काळातील इतिहासलेखन : प्राचीन ग्रीस व रोममधील अनेक कोरीव लेख म्हणजे दगडांवर कोरलेले तह, करारनामे किंवा राजांच्या आज्ञा असून काहींत राजांच्या खाजगी जीवनासंबंधीही माहिती दिलेली आहे. टॉलेमी राजांच्या व रोमन वर्चस्वाखालील ईजिप्तमधील पपायरसेवरही वरील पद्धतीचीच माहिती मुख्यत्वे सापडते. ह्याशिवाय तत्कालीन ग्रीक व रोमन नाण्यांवर राजांची नावे आढळतात.
‘‘ग्रीक हेच पहिले मानवी घटनांचे इतिवृत्त ठेवणारे लोक नसून त्यापूर्वीही अशा प्रकारची नोंद करण्यात आली आहेपरंतु ग्रीकांनी इतिहासाची चिकित्सा करून त्याच्या सत्यासत्यतेची मीमांसा केली, म्हणून इतिहासलेखनाची खरी सुरुवात त्यांच्यापासून झाली’’, असे जे. बी. बेरी ह्या ग्रीसच्या इतिहासावरील एका इतिहासतज्ञाचे मत आहे.
ग्रीसमधील सर्वांत प्राचीन लेखकांनी प्रथम महाकाव्ये लिहिली. उदा., होमरचे इलियड. त्यात पूर्वजांच्या कर्तृत्वाविषयी पाल्हाळिक व दंतकथात्मक पद्धतीने निरुपण केलेले दिसते. त्यानंतरच्या इ. स. पू. सातव्या व सहाव्या शतकांतील रचना पद्यात्मक व पौराणिक होती, परंतु त्यात राजांच्या वंशावळी, त्यांचे पराक्रम ह्यांचे रंजित वर्णन आढळते. ह्या पद्धतीमुळे ढोबळ कालमान मिळू लागला. यानंतर लोकांचे भूगोल, सागरी सफरी, वसाहती वगैरे विषयींचे कुतूहल जागृत झालेले दिसते, साहजिकच त्यांच्या प्रवासांतून मिळालेले अनुभव व त्यांनी पाहिलेले प्रदेश ह्यांची माहिती त्यात सामाविष्ट होऊ लागली आणि त्यामुळे तत्कालीन समाजातील धाडसी पुरुषांना बाहेरचे जग पाहण्याची इच्छा निर्माण झाली. थोडक्यात इ. स. पू. सहाव्या शतकात सुसंबद्ध इतिहासलेखनास सुरुवात झाली. त्याचे श्रेय पहिला इतिहासकार म्हणून ⇨ हीरॉडोटसला (इ. स. पू. सु. ४८४–४२४) द्यावे लागले कारण त्याने पुढील पिढीसाठी इतिहास लिहून, तोही गद्यात, त्यात तत्कालीन महत्त्वपूर्ण घटनांची व व्यक्तींची नोंद आणि सविस्तर चर्चा केली. त्याने दंतकथांचा उल्लेख करून तत्कालीन चालीरीतींद्वारे काही अनुमाने काढली. हीरॉडोटसनंतरचा दुसरा महत्त्वाचा इतिहासकार म्हणजे ⇨ थ्यूसिडिडीझ (इ. स. पू. सु. ४७१–३९९). त्याने पेलोपनीशियन युद्धाचा वृत्तांत देताना फक्त तत्संबंधित घटना व काळ ह्यांची विश्वसनीय माहिती देण्याचा यत्न केला. आपल्या पूर्वसूरींप्रमाणे त्याने चर्चेत आपणास गोवून घेतले नाही. यानंतरचा इतिहासकार म्हणजे ⇨ झेनोफन (इ. स. पू. सु. ४३०–३५५). तो तर इतिहासाच्या कथात्मक भागातच गुरफटलेला दिसतो. ह्या तीन इतिहासकारांच्या लेखनाचा पुढील इतिहासलेखनावर अनेक बाबतींत परिणाम झाला आणि पुढील इतिहासकारांनी त्यांचे अनुकरण केले.
Answer:aaditya khandekar
Explanation:bayafshztamzjxb