(२) उत्कृष्ट संभाषण कौशल्य आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्व हे यशस्वी रेडिओजॉकीचे महत्त्वाचे पैलू आहेत.
Answers
Answer:
ताज्यामुख्यमुंबईपुणेदेशग्लोबल
संभाषण कौशल्य यशाची गुरुकिल्ली - प्रा. झोळ
Aug 30, 2018
By
प्रा. प्रशांत चवरे
भिगवण - एकविसावे शतक हे अत्यंत स्पर्धात्मक व गुंतागुंतीचे झाले आहे. या शतकामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर अभ्यासक्रमाशिवायही अनेक बाबींकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. संवाद कौशल्य हे कोणत्याही क्षेत्रामध्ये यशस्वी होण्याची गुरुकिल्ली आहे. सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रामध्ये संवाद कौशल्य हा अविभाज्य घटक बनला आहे. विदयार्थ्यांनी नियमित अभ्यासक्रमांबरोबर संवाद कौशल्ये आत्मसात केल्यास यशाचा मार्ग अधिक सुकर होईल असे मत दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांनी व्यक्त केले.
स्वामी चिंचोली(ता.दौंड) येथील दत्तकला शिक्षण संस्थेच्या इन्स्टीटयुट ऑफ फार्मास्युटीकल सायन्स अॅँड रिसर्च व दत्तकला कॉलेज ऑफ फार्मसी यांचे संयुक्त विदयमाने संवाद कौशल्य या विषय़ावर आयोजित कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अमोल कुलकर्णी, संस्थेच्या सचिव माया झोळ, व्याख्याते डॉ. प्रशांत चवरे, प्रा. सचिन जाधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. अमोल कुलकर्णी म्हणाले, विदयार्थ्यांचे व्यक्तीमत्व हे बहुआयामी असले पाहिजे. यामध्ये आवांतर वाचन, विविध कौशल्ये आत्मसात करणे यासही महत्व दिले पाहिजे. विदयार्थ्यांना अभ्यासक्रम शिकविण्याबरोबरच त्यांच्या व्यक्तीमत्वामध्येही सकारात्मक परिवर्तन घडावे या हेतुने संवाद कौशल्य या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे त्याचा योग्य उपयोग करुन घ्यावा.
कार्यशाळेमध्ये संवाद कौशल्य आणि नोकरी व्यवसायाच्या संधी या विषयावर डॉ. प्रशांत चवरे यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेमध्ये गट चर्चा, वक्तृत्व कौशल्य, स्वत्वाची जाणिव, मुलाखत तंत्र, सर्जनशीलता आदी विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. प्रास्ताविक प्रा. विजय राजेमाने यांनी केले सुत्रसंचालन प्रा. ज्योती जावळे यांनी केले तर आभार प्रा. दत्तात्रय कातुरे यांनी मानले. कार्यशाळेमध्ये दत्तकला शिक्षण संस्थेच्या इन्स्टीटयुट ऑफ फार्मास्युटीकल सायन्स अॅँड रिसर्च व दत्तकला कॉलेज ऑफ फार्मसी मधील विदयार्थ्यांनी सहभाग घेतला.