Hindi, asked by yogitakambleyk19, 7 months ago



उताऱ्यात आलेले
चार वाक्प्रचार :-

answer please

माझ्या खाजगी उपोषणाची हकिगत चाळीत जाहीर झाली आणि येताजाता ही
माझी 'नाही ती भानगड' आहे, उगीच 'हात दाखवून अवलक्षण आहे, 'पेलले नाही
तेव्हा खाजगी झालं!' अशी वाक्ये माझ्या कानावर येऊ लागली. पण मी कोणत्याही
टीकेला भीक घालणार नव्हतो, 'एकशे एक्क्यांऐशी पौड' रात्रंदिवस ते कार्ड माझ्या
डोळ्यांपुढे नाचत होते. वजन कमी झाले पाहिजे. या विचाराने माझी झोप उडाली. झोप
कमी झाली तर वजन उतरते या विचाराने मला त्याचेही काही वाटत नव्हते. मी
पूर्वीसारखा गाढ झोपत नाही यावर धर्मपत्नीचामात्र अजिबात विश्वास नव्हता. "घोरत
तर असतारात्रभर!''अशासारखी दुरूत्तरे ती मला करत असे.
"दोन महिन्यात पन्नास पौंड वजन कमी करून दाखवीन तर खरा!" अशी
भीष्मप्रतिज्ञा करून मी आहारशास्त्रावरच्या पुस्तकात डोके घालू लागलो. प्रोटीनयुक्त
पदार्थ, चरबीयुक्त द्रव्ये वगैरे शब्दांबद्दलची माझी आस्था वाढू लागली. साऱ्या
ताटातले पदार्थ मला न दिसता नुसत्या 'कॅलरीज' मला दिसू लागल्या आणि आनंदाची
गोष्ट अशी, की वजन उतरवण्याच्या शास्त्रात पारंगत झालेले तज्ज्ञ मला रोज
डझनवारीने भेटू लागले. इतकेच काय, परंतु ज्याआमच्या चाळीतल्या लोकांनी माझ्या
उपासाची अवहेलना केली होती, त्यांनीच मला 'डाएटचा' सल्ला दिला. उदाहरणार्थ-
सोकाजी त्रिलोकेकर.
please answer it's so important ​

Answers

Answered by rachitshama854
1

Answer:

मराठी व्याकरण

शुद्धलेखन म्हणजे काय?

आपण आपले विचार बोलून किंवा लिहून दाखवितो. आपल्या या बोलण्याला म्हणतात 'भाषा', व तेच लिहून दाखविण्याला 'लेखन' म्हणतात.

आपण बोलताना शब्दांचे उच्चार करतो. त्यांतील काही अक्षरे -हस्व असतात, काही दीर्घ असतात, तर काहींचा उच्चार नाकातून होतो. शब्दांतील या -हस्व - दीर्घ व सानुस्वार अक्षरांच्या उच्चाराप्रमाणे बोलणे म्हणजे शुद्ध बोलणे; व बोलण्यातील शुद्ध उच्चाराप्रमाणे ते अक्षरांत लिहून दाखविणे याला स्थूलमानाने 'शुद्धलेखन' म्हणायला हरकत नाही.

मराठी व्याकरण

आपण जे लिहितो ते शुद्ध म्हणजे निर्दोष असावे असे सर्वांना वाटते. हे लेखन शुद्ध व बिनचूक असावे याबद्दल काही नियम घालून देण्यात आलेले असतात. यांनाच 'शुद्धलेखनविषयक नियम' असे आपण म्हणतो.

शुद्धलेखनाबाबतचे आजचे नियम पूर्वीपेक्षा कितीतरी सोपे झालेले आहेत. ते नीट समजावून घेतले की आपले लेखन निश्चित सुधारते.

आपले विचार जसे इतरांना समजले पाहिजेत, तसे इतरांचे विचार आपल्याला समजायला हवेत. यासाठी आपली भाषा एका विशिष्ट ठरलेल्या पद्धतीनेच बोलली किंवा लिहिली गेली तरच ती 'शुद्ध' समजली जाते. त्यात काही चूक झाली तर ती अशुद्ध ठरते.

मराठी व्याकरण

जसे 'तो पुस्तक वाचतो', 'त्याने पुस्तक वाचले', 'त्याने पुस्तके वाचली' अशा ठरावीक पद्धतीनेच आपण बोलायला हवे. याऐवजी 'तो पुस्तक वाचला', 'त्याने पुस्तक वाचली', 'त्याने पुस्तके वाचतो' अशा पद्धतीने जर आपण बोललो तर ते चुकीचे ठरते.

आपण लिहितो त्या शब्दाचे किंवा वाक्याचे शुद्ध स्वरूप कोणते व अशुध्द स्वरूप कोणते यांबाबत काही नियम ठरविण्यात आले आहेत. हे नियम हाच व्याकरणाचा विषय, व्याकरणातील नियमांना अनुसरून केलेले निर्दोष लेखन म्हणजेच शुद्धलेखन. 'शुध्दलेखन' हा वेगळा असा विषय नाहीच. व्याकरणाचाच एक भाग आहे.

मराठी व्याकरण

शुद्धलेखनात शब्दांतील -हस्व - दीर्घ अक्षरे व अनुस्वार यांचाच आपण प्रामुख्याने विचार करतो; पण शुद्धलेखन याचा एवद्याचाच विचार करतो; पण शुद्धलेखन याचा एवढाच मर्यादित अर्थ नाही.

शब्दांतील अक्षरांचे लेखन एवद्याचाच विचार यांच्याही शुद्धलेखनात कारवायचा नसून वाक्यात येणाऱ्या शब्दांचा क्रम व त्यांची अचूक योजना, जोडाअक्षरातील वर्णांची अचूक रचना, विरामचिन्हाचा योग्य वापर यांच्याही शुद्धलेखनात समावेश होतो.

तसेच जोडशब्द तयार करताना शेजारचे वर्ण एकमेकांत मिसळतात; अनेक शब्दांचा एक शब्द करताना त्यातले काही शब्द कसे गळतात; व नवीनच शब्द कसे तयार केले जातात ( म्हणजेच संधी, समास व शब्दसिद्धी) यांच्याही विचार शुद्धलेखनात अवश्य करावा लागतो.

मराठी व्याकरण

आधी भाषा, मग व्यकरण :

'शुद्धलेखन' हा शब्दच थोडा फसवा आहे. आपले लेखन कशा प्रकारे करावे याबद्दल प्रारंभीच्या व्याकरणकारणी काही नियम ठरविले. त्याप्रमाणे जे लिहिले जाई ते त्या वेळी शुद्ध समजले जात असे.

पूर्वी मराठीत अनुस्वार बऱ्याच ठिकाणी दिले जात. उदा. 'नाही' वर अनुस्वार द्यावा लागे. 'काही' मधल्या दोन्ही अक्षरांवर अनुस्वार देत. 'मी कामे केली' हे वाक्य 'मी कामें केली' असे सानुस्वार लिहावे लागे.

याचे कारण त्या वेळच्या लोकांच्या बोलण्यात नासोच्चार खूप होते. त्यास अनुसरून, त्यात व्याकारणीक अनुस्वरांची भर घालून, तसेच अर्थभेद, व्युत्पत्तीने व परंपरा यांचाही विचार करून अनुस्वार कोठे द्यावेत व -हस्व - दीर्घ केव्हा लिहावे हे ठरविण्यात आले होते

. आता आपण तसा उच्चार करत नाही. आपल्या उच्चारात आता खूप बदल झाला आहे. म्हणून हे अनुस्वार आजच्या लेखनातून नाहीसे झाले आहेत.

मराठी व्याकरण

पूर्वीच्या लेखनावर संस्कृतचा पगडा विशेष होता. त्यामुळे शब्दामध्ये येणारे इ-कार व उ-कार संस्कुतपामने -हस्व लिहिले जात. आता आपण मराठीचे लेखन मराठीच्या उच्चारानुसार लिहू लागलो आहे.

प्रारंभी केलेल्या नियमांत आतापर्यंत वेळोवेळी बदल होत राहणार. भाषा बदलत चालली म्हणजे तिच्या लेखनपध्दतीतही बदल होणे साहजिक आहे. आधी भाषा बनते; मग तिचे व्याकरण ठरते.

भाषेत बदल होत गेला की व्यकरणकारकाला शरणागती पत्करावी लागते व पूर्वीच्या नियमांना मुरड घालावीच लागते. परिणामतः लेखनविषयक ठरलेल्या नियमांतही बदल करावाच लागतो.

लिहिण्याची शास्त्रशुद्ध पद्धत म्हणजे आपण बोलताना वर्णाचा जसा उच्चार करतो तसे लिहिणे. पण बोलण्यातील उच्चाराप्रमाणे लेखन करावयाचे तर आपली वर्णमाला अपुरी पडते. मराठीतील सगळे उच्चार लिहून दाखविण्याची सोय आपल्या वर्णमालेत नाही. तसेच, प्रत्येकजण आपल्या स्वतःच्या उच्चारपद्धतीप्रमाणे लिहू लागला तर मोठा कठीण प्रसंग निर्माण होईल.

एकमेकांचा विचार एकमेकांना समजायला हवा असेल तर एक विशिष्ट लेखनपध्दतीचा अनुसरणे भाग आहे. म्हणजेच लेखनाबाबत काही नियम ठरवून ते सर्वांनी आचरणात आणणे योग्य ठरते. अशा नियमांचा आपण 'शुद्धलेखनाचे नियम' म्हणत आलो.

Answered by kaustubh114923
0

Answer:

  1. नाही ती भानगड' आहे
  2. हात दाखवून अवलक्षण

3.पेलले नाहीतेव्हा खाजगी झालं

4.भीक घालणे

these are the 4 वाक्प्रचार

hope this helps you

Similar questions