Math, asked by dhoomyogiraj, 3 months ago

उदिश्ते ध्वनी प्रदूषणाचे मराठी​

Answers

Answered by Sharwin22
1

Answer: ध्वनिप्रदूषणाचे मानवी आरोग्यावर होणारे परिणाम

ध्वनिप्रदूषणामुळे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य या दोघांवर परिणाम होतो. ध्वनिप्रदूषणामुळे शारीरिक व मानसिक ताण वाढतो, मनुष्य चिडचिडा आणि आक्रमक होतो. त्याला झोप लागत नाही म्हणून त्याचे मानसिक संतुलन बिघडते व माणूस वेडापिसा होतो. ध्वनिप्रदूषणामुळे रक्तदाब वाढतो व हृदयरोगाला आमंत्रण मिळते. कारखान्यांत मोठ्या आवाजाच्या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना म्हातारपणी बहिरेपणा येतो, म्हणजेच ध्वनिप्रदूषणामुळे हळूहळू बहिरेपणा येतो. हृदयरोग असलेली व्यक्ती मोठमोठ्या ध्वनिवर्धकाच्या आवाजाने दगावण्याची शक्यता असते. गर्भवती स्त्रीच्या गर्भालाही ध्वनिप्रदूषणामुळे हानी पोहचू शकते. सणासुदीमध्ये स्पीकरच्या आवाजामुळे मोठ्या प्रमाणात ध्वनिप्रदूषण होते.

विमानतळाजवळ असलेल्या घरांच्या भिंतींना विमानाच्या आवाजाने तडे पडतात. ध्वनिप्रदूषणाचा जनावरांवरसुद्धा हानिकारक प्रभाव पडतो. सैन्याच्या पाणबुडीत वापरल्या जाणाऱ्या सोनार (sonar) या ध्वनिलहरींमुळे व्हेल ह्या प्रजातीच्या काही जातींचे मासे मृत्युमुखी पडतात.

ध्वनिप्रदूषण (नियमन व नियंत्रण), नियम, २०००

वाहनांची वाढती संख्या, औद्योगिकीकरण, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम, वेगवेगळ्या कारणांसाठी होणारे स्टेज शो अशा विविध कारणांमुळे ध्वनिप्रदूषणाची समस्या वाढत आहे. या समस्येवर नियंत्रण --59.94.1.10 ०८:१६, २२ जानेवारी २०१४ (IST)तिरप्या मुद्राक्षरातील मजकूरकरण्यासाठी हे नियम बनविण्यात आले.

यामधील नियम ५ व ६ आणि पर्यावरण संरक्षण अधिनियम, १९८६मधील कलम १५ अन्वये ध्वनिप्रदूषणाच्या मर्यादेचे उल्लंघन केले जात असेल तर त्यासाठी पाच वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे. फौजदारी प्रक्रिया संहितेतील तरतुदीप्रमाणे ध्वनिप्रदूषणाचा गुन्हा दखलपात्र व अजामीनपात्रही आहे.

ठाणे शहरातले ध्वनिप्रदूषण

पर्यावरणस्नेही गणेशोत्सव साजरा करण्यासाठी कृत्रिम तलावासारख्या संकल्पना राबवणाऱ्या ठाणे शहरांत विसर्जन मिरवणुकींदरम्यान मात्र ध्वनिप्रदूषणाने कमाल पातळी गाठल्याचे दिसून आले आहे. अनंत चतुदर्शीनिमित्ताने निघालेल्या विसर्जन मिरवणुकीच्या निमित्ताने दुपटीने वाढलेल्या ध्वनिप्रदूषणातून हे स्पष्ट झाले आहे. दहीहंडी उत्सवाप्रमाणेच गणेशोत्सवामध्येही ढोल-ताशांचा ढणढणाट, डॉल्बी, डीजे, बेंजोच्या कर्णकर्कश आवाजाने संपूर्ण शहरात बेलगाम धिंगाणा सुरू असतो.

ठाणे शहरामध्ये विसर्जन मिरवणुकीदरम्यान होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाचा अभ्यास ठाण्यातील स्वयंसेवी संस्थेने अनंत चतुदर्शीच्या सकाळी साडेनऊ ते रात्री ११ वाजेपर्यंत केला. रस्त्यांवर डीजेवर वाजणारे लुंगी डान्स, बत्तमीझ दिल, पिंकी, मुन्नी, कॅरेक्टर ढिला है अशा हिंदी गाण्यांचा धिंगाणा सुरू होता. शाळा, महाविद्यालये, हॉस्पिटल, पोलीस मुख्यालय आणि सरकारी कार्यालय परिसर अशा शांतता क्षेत्रांतही आवाजाची मर्यादा पाळली जात नव्हती. पोलीस यंत्रणांनी जणू या मंडळांना नियम धाब्यावर बसवण्याचा परवानाच दिल्याच्या आविर्भावात ही मंडळे वागत होती. शांतता क्षेत्रात झालेल्या आवाजाच्या नोंदणीवरून आवाजाची पातळी सुमारे दीडपटीने ते दुपटीने वाढली होती.

राम मारुती रोड, गजानन महाराज चौक, समर्थ भंडार, तलावपाळी, सेंट जॉन हायस्कूल, सिव्हिल हॉस्पिटल, चिटणीस हॉस्पिटल, गोखले रोड, हॉरिझोन हॉस्पिटल, गोडबोले हॉस्पिटल, पोलीस कमिशनर ऑफिस, कळवा गणेश घाट आणि ठाणे पूर्वेतील विसर्जन घाटांवर हे सर्वेक्षण करण्यात आले. सर्वात जास्त ध्वनिप्रदूषण हे तलावपाळी, सेंट जॉन हायस्कूल, कळवा येथील गणेश घाटावर होते. या भागांत ९० ते ९५ डेसिबल्स आवाजाची पातळी नोंदविण्यात आली आहे. त्याखालोखाल ८५ ते ९० डेसिबल्सची नोंदणी गजानन महाराज चौक, सिव्हिल हॉस्पिटल, चिटणीस हॉस्पिटल, गोखले रोड, हॉरिझोन हॉस्पिटल आणि ठाणे पश्चिमेतील विसर्जन घाटावर होती. ८० डेसिबल्सपेक्षा जास्त आवाजाची नोंद समर्थ भंडार, गोडबोले हॉस्पिटल, पोलीस मुख्यालयाच्या परिसरात झाली. त्यावर कोणतीही कारवाई केली गेली नाही.

ध्वनी प्रतिबंधित क्षेत्रामध्ये ध्वनिप्रदूषण करणाऱ्यांवर कडक कारवाई करीत ध्वनिप्रदूषण करणारे साहित्य जप्त करण्याचे अधिकार पोलिसांना आहेत. मात्र असे नियम तोडले जात असतानाही ठाणे शहरात पोलिसांनी कानाडोळा केल्याचे दिसून आले.

Step-by-step explanation:

Similar questions