English, asked by mramanand71, 9 months ago

वैचारिक निबंध
In marathi​

Attachments:

Answers

Answered by Angelshira22518
6

वेळेच महत्व

काळ, क्षण, टाइम, समय, वेळ...कुठलही नाव घ्या. पण ही जीवनातील सर्वात महत्वाची व गरजेजी गोष्ट आहे हे मात्र १०० टक्के एकदम खर आहे. ही एक अशी गोष्ट आहे जे कुठल्याही बाजारात विकत मिळत नाही किंवा पैसाने विकत घेता येत नाही. हिन्दी भाषेत एक खुप छान सुविचार आहे...

“ईश्वर एक बार में एक ही क्षण देता है,

और दुसरा क्षण देणे सें पहीले,

पहीले वाले क्षण को छीन लेता है।”

म्हणजे एकदा जर वेळ गेला की तो पुन्हा परत येत नाही. वेळेमुळे अनेक गोष्टी घडतात तर अनेक गोष्टी बिघडतात. वेळे वर इंग्रजी भाषेत सुद्धा कित्येक म्हणी आहेत, जसे टाइम इज मनी (Time is money), वन हू टेक्स टाईम सिरीअसली, टाईम टेक्स देम सिरीअसली. (One who takes time seriously, time take them seriously) इत्यादि. मराठीत म्हणतात न काळ आला होता पण वेळ आली नव्हती.

अस म्हटल जाते की, ज्या मनुष्याला वेळेचे नियोजन करता आले त्याला यशाच्या कुलपाची चाबी सापडली. परंतु हे साध्य करने किती जनाना शक्य होते. या जगात पाणी, सूर्यप्रकाश, हवा, जमीन आणि वेळ ह्या गोष्टी मनुष्य कधीही निर्माण करूच शकत नाही. आयुष्य हे सुध्दा जन्म व मृत्यू या दोन बिंदूतील काळ आहे. मग जो काळ अथवा वेळ आपण निर्माण करू शकत नाही त्याचा उपयोग कटाक्षाने केला पाहिजे. एकदा तो हातातून गेला की तो कायमचाच जातो.

जगात सर्वांनाच विधात्याने सारखाच वेळ दिलेला आहे. सर्वांना एका दिवसात २४ तासच मिळतात, कुणालाही २५ तास नाही मिळत. अस असताना, या जगात काही लोक यशस्वी होतात तर काही अपयशी का होतात? याच मुख्य कारण आहे वेळेचा सदुपयोग. जो मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करतो तो यशस्वी होतो व हे ज्याला जमत नाही ते अपयशी ठरतो.

कुणीही आजचा वेळ उद्या साठी वाचवून ठेवू शकत नाही.

Hope it helps!

Similar questions