वेगळा शब्द ओळखा. तो वेगळा का आहे? मुळकूज, तांबेरा, रूबेला, मोझॅइक.
Answers
Explanation:
वेगळा शब्द आहे रूबेला.
तो वेगळा आहे कारण, मुळकूज, तांबेरा आणि मोझॅक रोग वनस्पतींना होणारे रोग आहेत,तर रूबेला हा रोग मनुष्यांमध्ये होणारा रोग आहे.
रूबेला:
हा रूबेला विषाणुमुळे,मनुष्यांमध्ये होणारा रोग आहे. या रोगामध्ये ताप,डोळे लाल होणे,पुरळ येणे अशी लक्षणे दिसून येतात.
मोझॅक रोग:
हा रोग मोझॅक विषाणुमुळे वनस्पतींना होणारा रोग आहे.ज्या वनस्पतींना हा रोग होतो,त्यांच्या पानांवर हिरवे,पिवळे दाग येतात,नेहमीपेक्षा हे वनस्पती कमी प्रमाणात वाढतात,तसेच त्यांना येणारी फुले व फळे आकाराने लहान असतात.
तांबेरा:
हा रोग कवकांमुळे होतो.हा रोग बटाटा,गहू, ऊस,मका, बाजरी,ज्वारी,इत्यादीमध्ये दिसून येतो. या रोगामध्ये पानाच्या मागच्या बाजूला नारंगी रंगाचे डाग दिसून येतात.
मूळकूज:
या रोगामध्ये वनस्पतींच्या मूळांवर परिणाम होतो.या रोगामुळे,वनस्पतीची वाढ नीट होत नाही,पाने आकाराने लहान व त्यांच्या रंगामध्ये बदल दिसून येतो.या रोगामुळे वनस्पति जास्त काळ जगत नाहीत.