India Languages, asked by vcvejani10, 10 months ago

वाघीण आणि तिच्या पिल्लांची भेट हा प्रसंग शब्दबद्ध करा.​

Answers

Answered by Zehra10
62

Explanation:

आई आणि मुलाचे प्रेम अवर्णनीय असते. आई मुलांपासून दूर गेली, तर मुले तिची उत्कंठेने वाट पाहत असतात. आई परत आल्यानंतर मायलेकरांची भेट झाल्यावर दोघांना जो आनंद होतो तो अवर्णनीय असतो. या पाठातही वाघीण व तिची पिल्लं या मायलेकरांची विरहानंतर गाठ-भेट झालेली असते. आपल्या पिल्लांना सोडून रात्री शिकारीला गेलेली वाघीण‌ रात्रभर जंगलात हिंडलेली असते. थकून-भागून पिल्लांजवळ येताच ती त्यांना हाक मारते. आईची हाक कानावर पडल्यामुळे पिल्लांच्या आनंदाला पारावार उरत नाही, ती पटापट आईकडे झेपावतात. आनंदाच्या भरात ती पिल्लं तिच्या अंगावरही उड्या मारतात. एक पिल्लू तिच्या पाठीवर उडी मारताना घसरून धपकन पाण्यात पडतं; पण आपण पडलोय याचंही त्याला भान नसतं. आपली आई खूप थकून आलीय आणि तिला विश्रांतीची गरज आहे याचंही त्यांना भान राहिलेलं नसतं. थकल्या -भागलेल्या वाघिणीला खरंतर या गोंधळाचा त्रास होत असतो; पण ती त्यांच्यावर फारशी रागवत नाही. अप्रत्यक्षरीत्या तिलाही त्यांच्या आनंदामुळे जणू सुखच मिळत असावं. आई व मुलांच्या भेटीचा हा प्रसंग मनाला भिडणारा वाटतो.

Answered by nm7233608
24

Explanation:

this is your answer.......

Attachments:
Similar questions