विज्ञानाने मानव सुखी झाला काय?
Answers
Answer:
हो खरच या विज्ञान माणसाचे जितन सुखी केले आहे . आज आपण पाहतो कि घराच्या बाहेर निघाले कि
आपल्याला सर्त विज्ञानाच्या गोष्टी दिसतात . खरचं या विज्ञान नावाच्या राका नव्या पहाटेने माणसाचे जीवन सुखी केले आहे .
Answer:
खरे पाहता 'विज्ञान' ही माणसाचीच निर्मिती आहे. पण आज अनेक घटनांतून माणूस विज्ञानाच्या हातातील बाहुले झाल्यासारखा वाटतो. विशेषतः आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला असा अनुभव अनेकदा येतो. कधी कधी अगदी मोक्याच्या क्षणी विदयुतप्रवाह बंद पडतो, घरातील दिवे जातात, पंखा फिरत नाही, उद्वाहन ठप्प होते आणि आपण सारेजण अगतिक होतो; त्यावेळी आपणाला वाटू लागते की, माणूस हा विज्ञानाचा गुलाम झाला आहे !
खरे तर विज्ञान ही माणसाला लाभलेली दिव्य शक्ती आहे. विज्ञान म्हणजे मानवी सामर्थ्याचा स्रोत आहे. मानवाने विज्ञानाची उपासना केली नसती, तर आजवरची प्रगती होऊच शकली नसती. विज्ञानाच्या साहाय्याने मानवाने केलेली प्रगती हे मानवाच्याच अखंड, प्रखर साधनेचे फळ आहे. विज्ञान हा मानवाला लाभलेला परीस आहे. आज मानवी जीवनात असे एकही क्षेत्र आढळणार नाही की, जेथे विज्ञानाने प्रवेश केला नाही. विज्ञानाच्या साहाय्याने मानवाने अंतराळात प्रवेश केला आणि विशाल सागराचा थांग लावला. अवकाशात उपग्रह पाठवले आणि सागराच्या उदरातील खनिजांचा शोध घेतला.
विज्ञानाच्या साहाय्याने मानवाने आपले सामर्थ्य हजारो पटींनी वाढवले आहे. दृष्टी, श्रुती, स्मृती या साऱ्या बाबतीत माणूस आज सर्व प्राणिमात्रांत श्रेष्ठ ठरला आहे, तो केवळ विज्ञानाच्या बळावरच! माणसाने अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य केल्या, असाध्य रोगांवर विजय मिळवला. विज्ञानाच्या प्रगतीमुळे आता नेत्रदान, गात्रदान करणेदेखील सहज शक्य झाले आहे. विज्ञानाच्या साहाय्याने त्याने आज सारे जग जवळ आणले आहे. आज विज्ञानाने माणसाला इतके सामर्थ्य दिले आहे की, त्याला आता परमेश्वराजवळ मागण्यासारखे काही उरलेलेच नाही. किंबहुना विज्ञानच परमेश्वर बनला आहे.
माणसाने विज्ञानाच्या बळावर महाभयानक संहारक शस्त्रास्त्रे तयार केली. आजकाल वैज्ञानिक घोडदौडीत माणूस नैसर्गिक संतुलन हरवून बसला आहे. त्यामुळे 'विज्ञान' हा माणसाचा शत्रू आहे, अशा प्रकारची टीका विज्ञानावर कधी कधी केली जाते. पण गंभीरपणे विचार करता, यात विज्ञानाचा दोष नसून तो माणसांच्या वृत्तीचा दोष आहे, हे स्पष्ट होते. विज्ञान हा मानवाचा जिवलग सखा आहे. मानवाच्या विकसनशीलतेचे रहस्य विज्ञानाच्या सामर्थ्यात दडलेले आहे, यात शंका नाही.