India Languages, asked by rajshreebahekar, 7 hours ago

विज्ञान दिन वर बातमी लेखन in marathi Please help​

Answers

Answered by sonunimbajiwakode
32

Answer:

पिंपरी - शहरातील विविध शाळा, महाविद्यालयांमधून राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विज्ञान प्रयोगांचे प्रदर्शन, चित्रकला स्पर्धा, वैज्ञानिक प्रात्यक्षिकांद्वारे बाल वैज्ञानिकांचे भावविश्‍व उलगडले. मनोरंजक विज्ञान दालन व ऊर्जा दालनाला भेट देऊन विज्ञानाचा आविष्कार चिंचवड येथील सायन्स पार्कमध्ये विद्यार्थ्यांना पाहायला मिळाला. या वेळी विद्यार्थ्यांसह पालक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. पार्कमध्ये ठेवलेल्या विमानासमवेत सेल्फी काढण्याचा मोह विद्यार्थ्यांनाही आवरला नाही.

पालिकेचे चिंचवड येथील सायन्स पार्क विद्यार्थ्यांसाठी खुले ठेवले होते. त्याला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विद्यार्थ्यांनी कुतूहलाने सायन्स पार्कमधील वैज्ञानिक प्रकल्पांची माहिती घेतली. विज्ञान दिनी सायन्स पार्कची विद्यार्थ्यांनी सफर केली. २१ शाळांमधील सुमारे बाराशे विद्यार्थ्यांनी विज्ञान केंद्राला भेट दिली. विद्यार्थ्यांनी तारांगण, विज्ञान फिल्म व थ्रीडी शो पाहिला. या वेळी घेतलेल्या प्रश्‍नमंजूषेत ६३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. अल्फोन्सो हायस्कूल काळेवाडी, गोदावरी हिंदी विद्यालय, क्रिएटिव्ह स्कूल रावेत या शाळांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविला. डायनॉसोर, शास्त्रज्ञ अशा असंख्य प्रकारची माहिती घेतली. सायन्स पार्कचे प्रभारी शिक्षणाधिकारी सुनील पोटे यांनी माहिती दिली.

Explanation:

correct answer for your question Armmmy please Mark as Brainlist

Similar questions