(३) वाक्प्रचार
खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
(अ) भान ठेवणे.
(आ) उत्साहाला उधाण येणे.
(इ) रममाण होणे.
(ई) मूठभर मांस चढणे.
(उ) ऋण असणे.
Answers
Answered by
5
Answer:
Bhan us the affected area of
Answered by
0
Answer:
वाक्यप्रचार म्हणजे शब्दांचा असा समूह एकाच शब्दासाठी त्याच अर्थाचा दुसरा शब्द सांगणे होय.
भान ठेवणे - जाणीव ठेवणे.
वाक्यात उपयोग
- अनिलने केलेल्या मदतीसाठी श्यामने त्याच्या उपकारांचे भान ठेवले.
- दुःखात नेहमी मदत करणाऱ्या व्यक्तीचे आपण भान ठेवावे. वृक्ष आपल्याला नेहमी सावली देतात याचे आपण भान ठेवावे.
उत्साहाला उधाण येणे - खूप आनंद होणे.
वाक्यात उपयोग
- राहुलचा दहावीच्या परीक्षेत प्रथम क्रमांक आल्यामुळे त्याच्या उत्साहाला उधाण आले.
- मुलाला चांगल्या पगाराची नोकरी लागल्यामुळे आईच्या उत्साहाला उधाण आले.
- गौरव वक्तृत्व स्पर्धेत राज्यात प्रथम आल्यामुळे आई-वडिलांच्या उत्साहाला उधाण आले.
रममान होणे - मग्न होणे.
वाक्यात उपयोग
- लता मंगेशकर चे गाणे ऐकण्यात सीमा रममाण झाली.
- दहावीची परीक्षा जवळ आल्यामुळे रोहित अभ्यासात रममाण झाला.
- सुधीर चे गाणे ऐकून प्रवीण गाण्यात रममाण झाला.
मुठभर मास चढणे - स्तुतीने हुरळून जाणे.
वाक्यात उपयोग
- शीलाने वर्गात गणिताचे उत्तर बरोबर दिल्यामुळे सरांनी तिला शाबासकी दिली तेव्हा तिच्या अंगावर मूठभर मांस चढले.
- सरांनी रोहितच्या कुस्तीचे कौतुक केल्यामुळे रोहित च्या अंगावर मूठभर मांस चढले.
- सैन्यदलात लोकेशची भरती झाल्यामुळे लोकेश च्या अंगावर मूठभर मांस चढले.
ऋण असणे - कर्ज असणे.
वाक्यात उपयोग
- राजेशच्या शिक्षणाचा खर्च सावकाराकडून घेतल्याने सावकाराचे राजेशच्या वडीलांवर ऋण होते.
- मुलीच्या लग्नासाठी मुलीच्या बापावर अनेक लोकांचे ऋण होते.
- आईच्या दवाखान्यासाठी सोहमने निखिल कडून पैसे घेतल्यामुळे सोहम निखिलचा ऋणी होता.
Similar questions