वाक्प्रचार-निश्चय करणे
Answers
१) कान देणे : लक्षपूर्वक ऐकणे
आजीने सांगितलेली गोष्ट मुलांनी कान देऊन ऐकली.
२) आकाश कोसळणे : मोठे संकट येणे घरातील कर्ता पुरुष गेल्यामुळे सोनाबाईंवर आकाश
कोसळले.
३) सिद्ध होणे : तयार होणे
गडावर चढण्यासाठी रावी सिद्ध झाली. ४) पारा चढणे : रागावणे
घरी उशिरा आलेल्या साहिलला पाहून बाबांचा पारा चढला.
५) खडकातून पाणी काढणे : अशक्य गोष्ट पार पाडणे नापीक जमिनीत लागवड करुन महादूने जणू खडकातून पाणी काढले.
६)निश्चय दांडगा करणे : ठाम निश्चय करणे
पहाटे उठून अभ्यास करण्याचा सुमनचा निश्चय दांडगा होता.
७) मनस्ताप सहन करणे : मनाला होणारा त्रास सोसणे
राम नापास झाला, त्याचा आईला मनस्ताप सहन करावा लागला.
८) ताब्यात घेणे : सर करणे
गिर्यारोहकाने कडा सर केला होता.
९) मन खट्टू होणे : वाईट वाटणे
या वर्षी सुट्टीत गावी जायला मिळणार नाही, हे ऐकताच सीमाचे मन खट्टू झाले.
१०) एका पायावर तयार असणे : सदैव तत्पर असणे सिनेमा पहायला जाऊया म्हटले की रिया नेहमी एका
पायावर तयार होते.