२.वाक्प्रचार:
• पुढील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा:
(i) प्रशंसा करणे - अर्थ:
वाक्य:
(ii) ख्याती मिळवणे - अर्थ:
वाक्य:
please please jisko marathi aati hai vahi answer Dena
Answers
Answered by
8
Answer:
प्रशंसा करणे
अर्थ -स्तुती करणे
वाक्यात उपयोग-
१. स्वयंपाक छान केल्यामुळे घरातील सर्वांनी आईची प्रशंसा केली.
२. कार्यक्रमाचे योग्य नियोजन केल्यामुळे सर्वांनी दिनेश ची प्रशंसा केली.
३. गरीब कुटुंबातील असून सुद्धा परीक्षेत उत्तम गुण मिळवल्याबद्दल राहुलची शिक्षकांनी प्रशंसा केली.
जेव्हा केलेल्या कामाबद्दल कुणीतरी कौतुक करत असेल त्याला प्रशंसा करणे असे म्हणतात.
ख्याती मिळवणे.
अर्थ- प्रसिद्धी मिळवणे किंवा नाव कमावणे.
वाक्यात उपयोग-
१. विजयने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून खूप कमी वेळात ख्याती मिळवली.
२. राज्यस्तरीय स्पर्धेत बक्षीस मिळवून रामने राज्यभर ख्याती मिळवली.
३. दहाव्या वर्षी आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवून ज्ञानेश्वर ने ख्याती मिळवली.
एखाद्या केलेल्या उत्तम कार्यामुळे जेव्हा प्रसिद्धी मिळते त्याला ख्याती मिळवणे असे म्हणतात.
Similar questions