Computer Science, asked by rujalbapat, 1 month ago

वृक्ष आपले खरे मित्र आहेत हे उदाहरणे देऊन स्पष्ट करा​

Answers

Answered by gourisdhumal28
1

Explanation:

आपण आपल्या या वृक्षमित्राचा घात केल्याने स्वत:वरच दुष्काळाचे, प्रदूषणाचे संकट ओढवून घेत आहोत, याचा माणसाला विसर पडलेला आहे. वृक्ष ही निसर्गाची फुप्फुसे आहेत. हवेतील कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात आणि 'प्राणवायू' हवेत सोडून हवा शुद्ध करण्याचे काम करतात. यामुळे माणसाचे जगणे सुकर व सुखी झाले आहे

वृक्ष आपल्याला सहस्र हातांनी मदत करतात. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा तर ते भागवतातच; शिवाय आपल्या पूजाविधीसाठी नानाविध साहित्य देऊन आपल्याला सुखावतात. आज वनस्पतींपासून मिळालेल्या अनेक औषधींचा उपयोग करून माणसाने असाध्य आजारांवर मात केली आहे.

स्वतः जळून हे वृक्ष इतरांच्या उपयोगी पडतात. वृक्षाचा प्रत्येक अवयव माणूस, प्राणी, पक्षी यांना उपयुक्त आहे. वृक्षांजवळ भेदभाव नसतो. ते सर्वांना समान वागणूक देतात. अगदी त्याच्या अंगावर घाव घालणाऱ्या कुन्हाडीचे पातेही तो सुगंधित करतो. मानवाच्या एकाकी जीवनातही वृक्ष साथसंगत देतात. माणूस आपल्या अनेक आठवणी या वृक्षांशी जपून ठेवतो. तो त्यांच्याशी हितगूज करतो. असे हे वृक्ष मानवाचे जिवलग मित्र आहेत.

Similar questions