World Languages, asked by gtp3672, 8 months ago

*वृक्ष आपले मित्र मराठी निबंध​

Answers

Answered by marutidesaiga2328508
12

Answer:

आपल्या सूर्यमालेतील पृथ्वी हा एक असा ग्रह आहे. ज्यावर मानवाचे जीवन अस्तित्वात आहे. इतर दुसऱ्या कोणत्याही ग्रहावर मानवी जीवन नाही.

कारण तिथे मानवाला उपलब्ध संसाधने नाही आहेत. म्हणून पृथ्वी हा एक सर्वात सुंदर ग्रह आहे. या ग्रहावर मानवाला हवा, पाणी, निसर्ग आणि जमीन या सर्व मूलभूत गोष्टी उपलब्ध आहेत. यामुळे मानवाचे जीवन अत्यंत सुखदायकआहे.

तसेच या धरतीवरील वृक्ष हे पर्यावरणाचा महत्वाचा घटक आहे. इतर प्रकारच्या वृक्षांमुळे निसर्गाचे सौंदर्य फुलून दिसते. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात वृक्षांचे महत्त्व आहे.

वृक्ष हे मानवाचे मित्र सुद्धा असतात. आमच्यासाठी सर्व प्रकारचे वृक्ष हे खूप उपयुक्त असतात आणि वृक्षांपासून आपल्याला खूप फायदा होतो.आपल्या सूर्यमालेतील पृथ्वी हा एक असा ग्रह आहे. ज्यावर मानवाचे जीवन अस्तित्वात आहे. इतर दुसऱ्या कोणत्याही ग्रहावर मानवी जीवन नाही.

कारण तिथे मानवाला उपलब्ध संसाधने नाही आहेत. म्हणून पृथ्वी हा एक सर्वात सुंदर ग्रह आहे. या ग्रहावर मानवाला हवा, पाणी, निसर्ग आणि जमीन या सर्व मूलभूत गोष्टी उपलब्ध आहेत. यामुळे मानवाचे जीवन अत्यंत सुखदायकआहे.

तसेच या धरतीवरील वृक्ष हे पर्यावरणाचा महत्वाचा घटक आहे. इतर प्रकारच्या वृक्षांमुळे निसर्गाचे सौंदर्य फुलून दिसते. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात वृक्षांचे महत्त्व आहे.

वृक्ष हे मानवाचे मित्र सुद्धा असतात. आमच्यासाठी सर्व प्रकारचे वृक्ष हे खूप उपयुक्त असतात आणि वृक्षांपासून आपल्याला खूप फायदा होतो.वृक्षांमुळे मानवाला शुद्ध हवा मिळते. तसेच त्यांच्यापासून फळ, फुल, भोजन आणि इंधन प्राप्त होते. तसेच वृक्ष हे सर्व सजीवांना आणि मानवाला जीवन जगण्यासाठी ऑक्सिजन प्राप्त करतात. त्याच प्रमाणे ते सजीवांना हानिकारक असणाऱ्या कार्बन डाय ऑक्साईडला अवशोषित करतातमानव वृक्षांच्या लाकडाचा उपयोग आपल्या दैनंदिन जीवनामध्ये करतो. ग्रामीण भागातील लोक हे वृक्षांच्या लाकडाचा उपयोग इंधन म्हणून करतात. तसेच मानव घरे बांधण्यासाठी करतो.

मानव वृक्षांच्या लाकडापासून खिडक्या, दरवाजे आणि विविध प्रकारची तयार करतो. त्याच प्रमाणे उद्योगांना कच्चा माल सुद्धा तयार केला जातो. वृक्षांच्या लाकडापासून रबर, माचीस इ.केली जातात.वृक्षांपासून अनेक प्रकारची औषधे ही तयार केली जातात. विविध प्रकारच्या वृक्षांमध्ये औषधी गुणधर्म असतात. जे आपल्या शरीरातील अनेक आजार बरे करण्यास मदत करतात.तसेच झाडे ही जमिनीला सुपीक बनवण्यात सर्वात महत्वाचे कार्य करतात. जर जमीन सुपीक राहिली तर त्या जमिनीमध्ये चांगल्या प्रकारचे पीक मिळते. यामुळे वृक्षांची मुळे ही जमिनीवरील माती रोखण्याचे कार्य करतात. पूर आल्यावर वृक्ष मातीला वाहून जाण्यापासून रोखतात.वृक्ष आणि मानव यांचा अतूट संबंध आहे. निसर्गाच्या इतर गोष्टींप्रमाणेच आपल्या भारतीय संस्कृतीत वृक्षां फार महत्त्व दिले गेले आहे.

हिंदू धर्मामध्ये वृक्षांची पूजा केली जाते. जसे कि, वड, पिंपळ, तुळस, पीपल यांसारख्या वृक्षांना देवाचे निवास स्थान मानले जाते.आपल्या सर्वाना वृक्षांचे महत्त्व समजून घेतले पाहिजे. आपण झाडे तोडण्याऐवजी जास्तीत – जास्त वृक्ष लावणे गरजेचे आहे. वृक्ष हे आपले खरे मित्र आहेत हे जाणून घेऊन आपण त्यांचे संगोपन आणि संरक्षण केले पाहिजेत.

Explanation:

please mark as brainliest

Similar questions