Sociology, asked by surajabadar, 2 months ago

वृक्षांच्या रोपांची मागणी करणारे पत्र.

Answers

Answered by sanketkoladiya1811
5

Answer:

वृक्षारोपणास फुलझाडांची रोपे मिळण्यास उद्यान अधीक्षकास पत्र लिहा.

अ. ब. क.

६।६ आनंदनगर,

कर्वे रोड,

पुणे - ४११००४.

२०।६।२०१२

प्रति,

मा. उद्यान अधीक्षक,

कोथरूड रोपवाटिका,

पुणे महानगरपालिका,

पुणे - ४११००४.

विषय :- वृक्षारोपणासाठी फुलझाडे मिळणेबाबत

महोदय,

कर्वे रोडवरील आनंदनगर ही मध्यमवर्गीय लोकांची वसाहत आहे. त्या वसाहतीमध्ये फुलझाडे लावून तिला सुशोभित करण्याचा आम्हा निवासीयांचा मानस आहे. 'सुंदर पुणे' ही आमची संकल्पना सत्यात उतरविण्यासाठी आम्हाला बरीच फुलझाडे लागणार आहेत. आपल्या कोथरूड रोपवाटिकेतून आम्हाला ती उपलब्ध करून दिल्यास आम्ही उपकृत होऊ. त्यासाठी लागणारा सर्व खर्च करण्यास वसाहतीतील निवासी स्वखुशीने तयार आहेत. (तरी आपल्याकडून होकाराच्या प्रतीक्षेत.) कळावे।

आपला विश्वासू,

अ. ब. क.

सोसायटी प्रतिनिधी

Read also : अभिनंदन पत्र लेखन मराठी

रोपांची मागणी करणारे पत्र - 2

प्रति

अध्यक्ष

महाराष्ट्र शासन रोपवाटिका विभाग

विषय: रोपांची मागणी करण्याबाबत

महोदय,

मी खाली सही करणारा राहुल शाह, आनंदराव पवार शाळेत शिकणारा विद्यार्थी आहे. आमच्या शाळेत एक मोठे मैदान आहे, त्या मैदानातील झाडे उन्हाळ्यामुळे सुकून पडली आहेत. तर मी आपणास विनंती करतो की आपण रंगीत, शोबिवंत रोपे पाठवावीत.

आपला विश्वासू,

राहुल शाह.

Read also : क्रीडा साहित्याची मागणी करणारे पत्र

रोपांची मागणी करणारे पत्र - 3

अ.ब.क

कार्यप्रमुख,

पेठे हायस्कूल,

पुणे-१२३४५६.

दि- १८ मे,२०१९

प्रति,

मा. व्यवस्थापक,

मयुरेश्वर रोपवाटिका,

सणसवाडी,

पुणे- ६७८९१०.

विषय- वृक्षारोपणासाठी रोपांची मागणी.

महोदय,

आमच्या शाळेत ५ जुलै रोजी पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण समारंभाचे आयोजन केले आहे. त्यासाठी आम्हांंला पुढील रोपांची तातडीने गरज आहे.

गुलाब

१० रोपे

तुळस

१० रोपे

सदाफुली

१० रोपे

जास्वंद

१० रोपे

वरील रोपे लवकरात लवकर योग्य किंमतीच्या बिलासोबत शाळेच्या पत्त्यावर पाठवून द्यावीत.

धन्यवाद.

अ.ब.क

आपला विश्वासू

Similar questions