Geography, asked by sahilsri6932, 1 year ago

वृक्ष माझा सखा निबंध

Answers

Answered by varuncharaya20
145

वृक्षांच्या सांनिध्यात रहायला कुणाला आवडत नाहीं ? वृक्षांच आपल्या जीवनातील महत्व खर तर वेगळं सांगण्याची गरज नाही. पण हवेचं शुद्धिकरण, पावसांच मान, जमिनीची धूप रोखण, प्रदूषणावर नियंत्रण आणि मुख्य म्हणजे ग्रामीण जनतेला सर्पण पुरवणे, इमारती लाकूड, औषधी उपयोग, असे अनेक उपकार आपली ही वृक्षराजी आपल्यावर करत असते . मुंबईसारख्या सिमेंटच्या जंगलातसुध्दा आपल्या  परिसरात अनेक प्रकारचे वृक्ष  आपल्या दृष्टीस पडतात. जेंव्हा ते नवीन पालवीने अथवा सुंदर फुलांनी बहरलेले असतात तेव्हा ते आपले लक्ष वेधून घेतात. वर्षानुवर्षे आपण त्याना बघत आहोत पण त्यांच नावगाव काय, ते आले कुठून, त्याचं वेगळेपण किंवा वैशिष्ठ्य काय, स्थानिक जैवविविधतेवर त्यांचा काही परिणाम असतो का, असे अनेक प्रश्न आपल्या समोर उभे राहतात. आपण जर त्याना मित्र समजतो तर त्यांची थोडी तरी माहिती असायला पाहिजे असं  नाही  वाटत तुम्हाला? मग चला तर सिटी-वॉकला. दर पत्रिकेत एकेका वृक्षाची ओळख करून घेऊया. मात्र त्यांच्याशी मैत्री वाढवण  सर्वस्वी तुमच्या  हातात आहे. ही  ओळख करून देत आहेत डॉ. विद्याधर ओगले. 
Similar questions