Hindi, asked by bhoomirajani1984, 6 months ago

वृक्षा नष्ट झाले तर बार निबंध लिहा​

Answers

Answered by Anonymous
1

Answer:

वृक्षाचे नाव एकताच, एकच गाणे आठवते व ते म्हणजे “वृक्षवल्ली आम्हा सोयरी”. परंतु आज हे फक्त गायनातच शिल्लक राहले आहे. निसर्ग आणि पर्यावरण हेच जीवनाचे आधार आहे. वृक्ष नाही तर जीवन सुद्धा नाही. संपूर्ण जगात विकासाच्या नावाखाली अनेक झाडे तोडली जात आहेत. ज्याचे गंभीर परिणाम दिसायला लागले आहेत. आज सर्व प्रदेश, पहाड़, जंगल हे वृक्ष नष्ट झाल्याने ओसाड पड़ले आहेत. औषधीयुक्त वनस्पतींची दुर्मिळता झाली आहे. वृक्ष नष्ट होत असल्यामुळे पाऊस सुद्धा पडत नाही. या मुळे सृष्टीचे वैभव संकटात पडले आहे.

पाऊस कमी पडल्यामुळे पाणीटंचाई ची समस्या तीव्रतेने जानवत आहे. दूषित पाण्यामुळे रोगराई वाढत आहे. विकासाच्या नावाखाली वृक्षतोड़ झाल्यामुळे व नवीन वृक्षांचा लागवड न झाल्यामुळे पर्जन्यमान कमी झाले आहे. शहरात रस्ते दुरूस्ती, रस्तेरुंदी, उंच-उंच इमारतीचे बांधकाम करण्या करता मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे, ज्यामुळे उष्णतेचा पारा वाढलेला आहे. देशात कित्येक ठिकाणी तापमान ४५° C पेक्षा अधिक पोहचला आहे. म्हणून विकासाच्या योजना आखताना व शहरीकरण करताना मूलभूत सुविधांकडे, पर्यावरण रक्षणाकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे.

Similar questions