वृक्षसंवर्धन करणे का गरजेचे आहे ?
Answers
वृक्षांचे महत्व संतांनी फार पुर्वी सांगीतले आहे . संत तुकारा म्हणतात ' वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे' या अभंगातून ते वृक्षांचे आपल्या जीवनातील महत्व सांगतात. वृक्ष तोडीमुळे जमीनीची ,मातीची धूप होते, प्रदुषणात वाढ होते, तसेच तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे . वृक्ष तोडीमुळे जगंल ओस पडु लागली. त्यामुळे पावसाचे प्रमाण कमी होत आहे तसेच जमीनीवर पाण्याचे साठे आणि भुगर्भातील पाणी पातळी वाढत नाही. औषधी वनस्पती पण कमी होत आहे . दुष्काळाचे प्रमाण वाढत आहे . या सर्व गोष्टीचा विचार केला तर वृक्षसंवर्धन खुप गरजेचे आहे हे लक्षात येते. यासाठी सर्वांनी मिळुन प्रयत्न केले पाहिजे. त्यासाठी प्रत्येकाने वृक्ष लागवड करणे, त्यांचे संगोपण करणे, वृक्ष तोड थांबवणे गरजेचे आहे . वृक्ष लागवडीचे फायद्यांचा प्रचार करणे. भूजल पातळीत वाढ करणे. या उपाय योजना कराव्यात.
वृक्षसंवर्धन
निसर्ग आपल्याला भरभरून देतो. माणूस त्याच्या अंगाखांद्यावर जगतो आहे. निसर्ग आपला गुरू आहे. तो सन्मार्ग दाखवतो. पण लक्षात कोण घेतं… आज हाच माणूस आपल्या उपकारकर्त्यावर उलटला आहे.
मनमोही पावसाने निसर्गासारखेच माझ्या अंतर्मनाला मोहविले आहे. झिमझिमणार्या पावसात सृष्टीचे सुजलाम् सुफलाम् रूप न्याहाळताना नकळत तुकाराम महाराजांचे भावमधुर काव्य आणि स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या सुरेल स्वरांचा साज लाभलेले कर्णमधुर गीताने कान टवकारले –
‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे |
पक्षीही सुस्वरे आळवीती ॥
वृक्ष आणि वेली निसर्गाचे सर्वोत्तम वरदान. संथपणे एका लयीत बरसणार्या पावसाच्या सरींनी बहरलेल्या सृजनशील निसर्गाच्या सान्निध्यात सृष्टीचा दृक्श्राव्य अनुभव घेता यावा, यासारखे भाग्य ते कोणते? मनातील आठवणींची पिसे भिरभिरू लागली.
धरणीमातेने मुक्त हस्ते बहाल केलेला मौल्यवान खजिना म्हणजे वृक्ष आणि वेली. ‘परोपकाराय फलन्ति वृक्षाः’ या शब्दात वृक्षांचा गौरव केलेला आहे. निसर्ग आणि मानव यांच्यातील स्नेहसंबंध फार पुरातन कालापासून आहे. अगदी अनादी कालापासून निसर्ग मानवाचा मित्र आहे. वृक्ष ही निसर्गाने मानवाला दिलेली देणगी आहे.
अलीकडे पर्यावरण प्रदूषणाविषयी बरेच काही वर्तमानपत्रातून वाचायला मिळते. प्रदूषणाचे दुष्परिणाम आता सर्वत्र मोठ्या प्रमाणात जाणवू लागले आहेत. आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्याच पृथ्वीचा, मानवाने सुरू केलेल्या जंगलतोडीमुळे पृथ्वीचा समतोल बिघडत चाललेला आहे.