History, asked by Sanket623, 10 months ago

वृक्षवल्ली आम्हां सोयरी या विषयावर कल्पनाविस्तार लिहा​

Answers

Answered by Anonymous
6

⠀⠀⠀⠀वृक्षवल्ली आम्हां सोयरी!

'वृक्षवल्ली आम्हां सोयरी!' ही संत तुकाराम महाराजांची प्रसिद्ध उक्ती आहे. आपल्या भोवतालच्या नातेवाईकांपेक्षा, प्रियजनांपेक्षा संत तुकाराम महाराजांना झाडावेलींचा सहवास अधिक हवाहवासा वाटत होता. त्यामुळे ते घरापासून दूर डोंगरात झाडावेलींच्या सहवासात रमत. तेथे अभंगरचना करत आणि विठ्ठलाच्या भक्तीत रंगून जात.

आजही आपल्याला वृक्षवल्ली हे सोयऱ्यासारखेच आहेत. माणसांनी खूप प्रगती केली. शहरे उठवली. मात्र त्याच वेळी अफाट वृक्षतोड केली. त्यामुळे निसर्गाचे संतुलन बिघडले. हवेतील प्रदूषण वाढले. पावसाचे प्रमाण कमी झाले. मग माणसांचे डोळे उघडले. 'झाडे लावा, झाडे जगवा' ही मोहीम माणसांनी स्वीकारली. झाडांचे उपयोग माणसांना आता उमगले आहेत. झाडे सावली देतात. देवपूजेसाठी हिरवीगार पत्री, रंगीबेरंगी फुले देतात. फुलांबरोबर सुगंध दरवळवतात. मधुर फळे देतात. घरे बांधण्यासाठी, फर्निचरसाठी झाडांपासून लाकूड मिळते. काही झाडांची पाने, साली, खोडे, मुळे ही औषधी असतात. झाडांमुळे प्रदूषण टळते. जमिनीची धूप थांबते. खरोखर, तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे वृक्षवेलीच आपले सगेसोयरे आहेत.

Answered by ItsShree44
0

Answer:

वृक्षवल्ली आम्हां सोयरी वनचरे' हे संसारात राहूनही विरक्त जीवन जगणाऱ्या तुकाराम महाराजांचे बोल आहेत. आपल्यासारख्या चालत्या-बोलत्या माणसांपेक्षा गावाबाहेरच्या जंगलातील, उपवनातील वृक्ष-वेली त्यांना आपल्याशा वाटतात. मानवी जगातील क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर अशा विकारांपासून दूर असणारी ही वृक्ष-वेली तुकारामांना जास्त आवडतात; कारण त्यांच्या सहवासातच या महान भक्ताला आपल्या मनाशी संवाद साधता येतो. मानव आणि ही वनस्पतिसृष्टी ही एकाच विधात्याची लेकरे. पण आज माणूस निसर्गापासून दूर गेला आहे. स्वतः केलेल्या प्रगतीमुळे त्याच्यातील अहंकार वाढला आहे.

'मला काहीही अशक्य नाही,' असे तो मानतो. आपला भूतकाळ तो विसरून गेला आहे. याच निसर्गाच्या कुशीत आपण वाढलो, हे तो विसरला आहे. याच वृक्षवल्लींच्या सान्निध्यात नित्य विहार करणाऱ्या आपल्या ऋषिमुनींनी 'वेद' रचले. भारतीय संस्कृतीची भक्कम बैठक आम्हांला दिली, हे सारे सोयीस्करपणे आपण विसरलो आहोत. प्रगतीचा कैफ चढलेल्या माणसांनी परमेश्वरनिर्मित निसर्गावर घाला घातला आहे.

विवेक हरवून बसलेल्या आजच्या माणसांत चंगळवादाला उधाण आले आहे. मोठमोठ्या इमारती उभारण्यासाठी दाट अरण्ये उद्ध्वस्त केली जात आहेत. अन्न शिजवण्यासाठी, शेकोटी पेटवण्यासाठी, घरे सजवण्यासाठी वारेमाप जंगलतोड केली जात आहे. कायदयाचा बडगा उगारला तरी कोट्यवधी रुपयांच्या चंदनाची चोरी होतच आहे.

हे सारे पाहिले की वाटते, हा माणूस किती अविचारी आहे ! निसर्ग जणू माणसाला सांगतो की, अरे, हे वृक्ष वर्षानुवर्षे जंगलात उभे आहेत ते तुमच्यासाठीच ना ! त्यांची फुले, फळे, पाने, सावली हे सारे तुमच्यासाठीच आहे ना! म्हणून तर तुमच्या पूर्वजांनी त्यांची बरोबरी संतपुरुषांबरोबर केली. वृक्ष बाहू पसरून आपल्यासाठी पावसाची प्रार्थना करतात. आपल्या मुळांनी पायाखालची जमीन घट्ट पकडून ठेवतात. जमिनीची धूप थांबवतात. वातावरणातील प्रदूषण टाळण्यासाठी प्रयत्न करतात. अनेक अमूल्य औषधे देतात.

हे वृक्ष, या वेली अनेक मौलिक गोष्टी आपल्याला देतात. उदात्तता, भव्यता आणि निर्मलता ही तर त्यांची ठेवच आहे. पण 'सर्वांशी समान वागणूक' हा त्यांच्या जीवनातून मिळणारा संदेश आहे. म्हणून माणूस आपल्या मुलाबाळांशी जसा वागतो, तसाच तो झाडांशीही वागला पाहिजे. हा संदेश जाणून सामाजिक वनीकरणाचे व्रत सर्वांनी स्वीकारले पाहिजे.

Similar questions