वाक्याचा काळ ओळखा. सीमा सहलीला जाईल.
वर्तमानकाळ
भूतकाळ
भविष्यकाळ
यापैकी नाही
Answers
Answer:
भविष्यातील काळ योग्य उत्तर आहे
Answer:
भविष्यकाळ
Explanation:
कुठल्याही भाषेत वाक्यातील क्रिया ही कधी घडली हे समजण्यासाठी काळाची गरज असते.
काळाचे तीन प्रकार आहेत.
१. वर्तमान काळ-
ज्यावेळी वाक्यातील क्रिया ही सद्यस्थितीत घडत आहे असा अंदाज येतो त्याला वर्तमान काळ असे म्हणतात.
उदाहरणार्थ-
१. राम आंबा खातो.
२. राधा पुस्तक वाचत आहे.
वरील विधानांवरून असे समजते की क्रिया ही सद्यस्थितीत चालू आहे म्हणून दिलेल्या विधानांचा काळ वर्तमानकाळ आहे.
२. भूतकाळ-
दिलेल्या वाक्यातील क्रियापदा आवरून क्रिया घडून गेली असा बोध होत असेल तर त्याला भूतकाळ असे म्हणतात.
उदाहरणार्थ-
१. तो शाळेत गेला होता.
२. ज्ञानेश्वराने पुस्तकालयाला भेट दिली होती.
वरील वाक्यातील क्रियापदावरुन क्रिया अगोदरच झाली आहे असा उल्लेख होतो म्हणजे या वाक्यातील काळ भूतकाळ आहे.
३. भविष्यकाळ-
वाक्यातील क्रियापदा वरून क्रिया ही येणाऱ्या काळात होणार आहे असा उल्लेख होतो त्याला भविष्यकाळ असे म्हणतात.
उदाहरणार्थ-
१. राम शाळेत जाईल.
२. गीता आंबा खाईल.
वरील विधानांमधील क्रियापदांवरुन भविष्यात क्रिया होणार आहे असा बोध होतो म्हणून दिलेल्या वाक्यांतील काळ भविष्य काळ आहे.
सीमा सहलीला जाईल.
या वाक्यातील क्रियापदावरुन क्रिया ही भविष्यात होईल असा उल्लेख होतो म्हणून दिलेल्या वाक्यातील काळ हा भविष्यकाळ आहे.